Raj Thackeray News : पदाचे जोडे काढा अन् एकदिलाने काम करा ; राज ठाकरे

Raj Thackeray
Raj Thackerayesakal

Nashik News : ग्रामीण भागातील शाळा, सरकारी रुग्णालयांची अवस्था दयनीय असल्याचे सांगताना, त्याविरोधात आवाज उठविण्याची जबाबदारी पक्षाचे कार्यकर्ते म्हणून तुमची आहे. नागरिकांच्या मूलभूत समस्यांबाबत कार्यकर्त्यांनी एकजुटीने आवाज उठविला पाहिजे.

बाकी यंत्रणा कशी हलवायची ते पक्ष पाहून घेईल. पण त्यासाठी पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने नागरिकांमध्ये मिसळून त्यांच्या समस्या सोडविल्या पाहिजे.

यासाठी कार्यकर्त्यांनी पदांचे जोडे काढून पक्षासाठी एकदिलाने काम करायला पाहिजे, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. (Raj Thackeray Instructions in meeting of rural office bearers Nashik News )

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर असून, रविवारी (ता. २१) जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विविध समस्यांचा पाढा ठाकरे यांच्यासमोर वाचला.

या वेळी ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, स्थानिक पातळीवरील समस्या सोडविणे, त्यासाठी आवाज उठविणे, स्थानिक नागरिकांच्या मूलभूत समस्यांबाबत कार्यकर्त्यांनी संवेदनशिलतेने गंभीर राहिले तरच पक्षाची नाळ नागरिकांशी जोडली जाऊ शकेल.

त्यासाठी कार्यकर्त्यांनी पदांचे जोडे बाजूला काढून ठेवायला पाहिजे. पक्षाचे संघटन कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केल्याने वाढते. या वेळी माजी महापौर अशोक मुर्तडक, सलीम शेख, प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंत्रे, शहराध्यक्ष दिलीप दातीर, जिल्हाध्यक्ष अंकुश शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Raj Thackeray
Raj of Raj-Koti Passed Away: दिग्गज दाक्षिणात्य संगीतकार राज यांचे निधन

अनेकांचा हिरमोड

मनसे शहराध्यक्षपदाचा दिलीप दातीर यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. त्यामुळे ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यात नवीन शहराध्यक्षाची निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यासाठी अनेकांची नावेही चर्चेत होती.

परंतु दोन दिवसाच्या ठाकरे यांच्या दौऱ्यात शहराध्यक्ष पदावरील कोणतीही चर्चा झाली नाही, वा दातीर यांनी दिलेला राजीनामाही त्यांनी मंजूर केल्याचे जाहीर केले नाही. त्यामुळे दातीरच शहराध्यक्षपदी कायम असल्याचेच सध्या मानले जात आहे. परंतु यामुळे अनेकांचा हिरमोड झाल्याचीही चर्चा आहे.

Raj Thackeray
Raj Thackeray यांनी समस्या घेऊन आलेल्या लोकांना तंबी दिली | MNS | Nashik

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com