Rajya Natya Spardha : रसिकांनी साधली नाट्य कुंभमेळ्याची पर्वणी

61st Maharashtra State Amateur Drama Competition
61st Maharashtra State Amateur Drama Competitionesakal

नाशिक : नाशिकमध्ये ६१ वी राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. महिन्याभरात तब्बल ३९ बहारदार नाटकांचे सादरीकरण झाले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नाट्य संस्थांनी कला रामभूमीत सादर केली.

अवघ्या नाशिककरांसाठी कुंभमेळ्यासमान ही नाट्य पर्वणीच म्हणावी लागेल. या स्पर्धेतून नाशिककरांना काय मिळाले, याविषयी नाट्य क्षेत्रातील व्यक्तींच्या भावना. (Rajya Natya Spardha final round festival of Natya Kumbh Mela achieved by fans nashik news)

"१९८० नंतर राज्य नाट्य अंतिम स्पर्धा नाशिकमध्ये पार पडली. इतक्या वर्षानंतर नाशिकमधील रसिकांना व नाट्यक्षेत्रातील व्यक्तींना ही पर्वणी उपलब्ध झालेली असताना त्याकडे पाठ फिरवली. यावरुन नाशिकच्या कलावंतांमध्ये किती उदासीनता हे दिसून आले. जवळपास ३९ नाटके मी बघितली. त्यातून मला खूप काही शिकायला मिळाले."

- मुकुंद कुलकर्णी, ज्येष्ठ दिग्दर्शक

"सर्व रंगकर्मी व नाट्य रसिकांसाठी ही एक पर्वणीच म्हणावी लागेल. संघांना तांत्रिकदृष्ट्या तसेच दहा-बारा वर्ष राज्य नाट्य स्पर्धेचे प्राथमिक फेरीचे आयोजन करत असल्यामुळे त्याचा अनुभव माझ्या पाठीशी आहे. पण अंतिम स्पर्धा करायची म्हणजे नेमकं काय तर आत्तापर्यंत दहा-बारा वर्ष स्थानिक रंगकर्मींना घेऊन या स्पर्धा होत असतात. नियोजनाच्या दृष्टीने आम्ही समित्या स्थापन केल्या. समितीचा रोजचा आढावा घेत होतो. बाहेरच्या संघांचे नियोजन करणे आणि प्रत्यक्ष प्रयोग साजरा होण्याच्या वेळी त्यांना संपूर्ण सहकार्य करत गेलो."

- राजेश जाधव, मुख्य समन्वयक, राज्य नाट्य स्पर्धा

"खूप छान पद्धतीने नाटकांचे सादरीकरण झाले. मला बहुतांशी नाटके आवडली. जुन्या काळातील सेट, मॉडर्न सेट याविषयी माहिती व प्रकार बघायला मिळाले. त्यामुळे आयोजकांचे मी मनस्वी आभारी आहे."- दूर्वाक्षी पाटील, कलाकार

61st Maharashtra State Amateur Drama Competition
Rajya Natya Spardha : अहिंसेच्या अज्ञानावर प्रकाशझोत टाकणारे ‘रक्ताभिषेक’

"प्रामाणिकपणे सांगते की खूपच सुंदर होते. पण अजून नाटकांचा दर्जा सुधारावा म्हणजे अंतिमला जर अशा प्रकारचे नाटक असतील तर प्राथमिकला कशी नाटक असू शकतात याचा एक छोटासा प्रत्यय मला अंतिम राज्य नाट्य स्पर्धेतून आला."- पूनम पाटील-चौधरी, अभिनेत्री

"सकाळी आणि संध्याकाळी दोन सत्रात नाटक असल्यामुळे दिवसभरात काम संपवून नाटके बघता आली. बऱ्याच गोष्टी चांगल्या वाटल्या. त्याच्यामध्ये काही नाटके एकांकिकांची दोन अंकी केलेली जाणवली. अभिनयासाठी प्रॅक्टिस झाली आणि दिग्दर्शनासाठी फायनलचे नाटक कसे असावे याविषयी माहिती मिळाली." - महेंद्र चौधरी, कलाकार

"नाट्य समितीमध्येच माझा प्रामुख्याने सहभाग असल्यामुळे आणि ज्या दोन केंद्रावरील स्पर्धा झाली. त्यातल्या प्रमुख जबाबदारी असल्यामुळे स्पर्धा बघणे व त्याचे आयोजन करणे ही खूप महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळाली." - विनोद राठोड, प्रकाश योजनाकार

"सर्व संघांनी आम्हाला छान रिप्लाय पाठवले. तुम्ही पोचल्यावर आमच्याबद्दलचे अनुभव शेअर करा किंवा तुम्हाला आम्ही समितीने केलेली मदत यांच्याबद्दल काही सांगा, याबद्दल छान मेसेज त्यांनी पाठवले. प्रत्येकाला आनंद झाला. आज संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व संघांनी आम्हाला धन्यवाद दिले." - ईश्वर जगताप, संयोजन समिती सदस्य

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

61st Maharashtra State Amateur Drama Competition
Rajya Balnatya Spardha : बालनाट्य स्पर्धेत नाशिकचे ‘रिले’ प्रथम

"नाशिकमधील सर्व नाट्य कलाकार, तंत्रज्ञ, लेखक, दिग्दर्शक यांना त्याचा खूप फायदा झाला. मराठी नाटक सध्या कोणत्या पातळीवर आहे,कोणते विषय हाताळले आहेत, याचा वेध घेता आला. सांस्कृतिक संचालनालयाचे त्यासाठी आभार मानायला हवे."- सतीश मोहोळे, लेखक

"ही नाशिककरांसाठी अभिमानास्पद बाब आहे. स्पर्धा खूप छान झाली. नाशिकच्या रसिकांना चांगल्या कलाकृती बघायला मिळाल्या. या स्पर्धेत खूप गोष्टी पाहायला मिळाल्या. नेपथ्य, प्रकाश योजना, संगीत, अभिनय, दिग्दर्शन सगळ्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने बघायला मिळाल्या."

- राजा पाटेकर, कलारसिक

"वेगवेगळ्या केंद्रावरची वेगवेगळ्या धाटणीची नाटके नाशिककरांना बघायला मिळाली. काही नाटके सोडली तर खूप नाटके खूप चांगल्या पद्धतीने सादर झाली. अभिनय व दिग्दर्शनाबरोबरच त्यात वापरलेले नेपथ्य, संगीत, लाइव्ह संगीत वेशभूषा, रंगभूषा हे वेगळ्या पद्धतीने नाशिककरांना बघायला मिळाले." - दिगंबर काकड, कलाकार

61st Maharashtra State Amateur Drama Competition
Rajya Natya Spardha : विधवांच्या दुःखावर फुंकर घालणारे ‘वृंदावन’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com