
Rajya Natya Spardha : अहिंसेच्या अज्ञानावर प्रकाशझोत टाकणारे ‘रक्ताभिषेक’
नाशिक : अहिंसेच्या मार्ग स्वीकारलेल्या राजाचे अज्ञान आणि त्याचा गैरफायदा घेणारे शत्रू यातून निर्माण झालेला संघर्ष म्हणजे ‘रक्ताभिषेक’ हे नाटक होय. भारत देश जिंकण्याचे सिकंदराचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीने पेटलेले युनानी राजाच्या बौद्धिक चातुर्याचे दर्शन या नाटकातून प्रेक्षकांना घडले. (Rajya Natya Spardha Raktabhishek that sheds light on ignorance of non violence nashik news)
राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत गुरुवारी (ता. २३) महाकवी कालिदास कलामंदिरात आनंदरंग कलामंच सोलापूर या संस्थेचे रक्ताभिषेक हे नाटक सादर झाले. नाटकाचे मूळ लेखक पद्मश्री डॉ. दयाप्रकाश सिन्हा असून नागेंद्र माणेकरी हे मराठी अनुवादित केले आहे.
प्रथमेश माणेकरी यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकात मुख्य भूमिकाही त्यांनी साकारली. राजा बृहद्रथाची अहिंसेच्या बाबतीत अंधश्रद्धा, त्याची सैनिक रणनीती आणि निर्णय क्षमता या गोष्टी तत्कालीन भारतीय सुरक्षा तंत्राला अक्षम बनवतात.
हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
तो युनानी आक्रमणकारी सिकंदराची भारतावरील अयशस्वी आक्रमण तसेच सेक्युलर सेल्युकसच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी टपून बसलेले युनानी राजा मिनेंडराचा भारतावरील आक्रमणाचा मार्ग प्रशस्त करतात.
रक्ताभिषेक नाटक अहिंसेच्या अर्ध्या अपूर्ण अज्ञानावर पुनर्विचार करण्यास उद्युक्त करतो. अहिंसेची वास्तविक संकल्पना आणि अज्ञान शेवटी हिंसा आणि भीषण रक्तपात घडवते. या नाटकात नागेंद्र माणेकरी, नरेंद्र कोगारी, अरविंद माने, ज्योतिबा सावंत, आसिफ शेख, श्रावणी पदकी, हर्षद कानडे आदींनी प्रमुख भूमिका निभावली. तारासिंग मरोड यांचे नेपथ्य तर, देवदत्त सिद्धम यांनी प्रकाशयोजना सांभाळली.