Rajya Natya Spardha : आई व मुलाचे नाते सांगणारे 'श्याम तुझी आवस ईली रे' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajya Natya Spardha

Rajya Natya Spardha : आई व मुलाचे नाते सांगणारे 'श्याम तुझी आवस ईली रे'

नाशिक : आई व मुलांमधील नाते सर्वश्रृत आहे. या नात्यामध्ये कधी दुरावा निर्माण झाल्यानंतर आपल्या आईवर हात उगारण्याचे पाप मुलाकडून घडते. त्यानंतर दुरावलेल्या आईला पुन्हा मिळवण्यासाठी मुलाने केलेला संघर्ष म्हणजे ‘श्याम तुझी आवस ईली रे’ हे नाटक होय. (Rajya Natya Spardha Shyam Tuchi Awas Eeli Re tells story of mother son relationship nashik news)

राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रविवारी ता.१९ दुपारी १२ वाजता महाकवी कालिदास कलामंदिरमध्ये स्वप्नील जाधव लिखित ‘श्याम तुझी आवस ईली रे’ हे नाटक सादर झाले. स्वराध्या फाउंडेशन, मालवण येथील संस्थेचे हे नाटक गणेश गावकर यांनी दिग्दर्शित केले आहे.

आई आणि मुलाच्या नात्यात आलेला दुरावा व ते पुन्हा एकत्र येण्याची गंमतीदार गोष्ट सांगते. आईच्या मिरगीच्या आजारपणामुळे मुलाचे भावविश्व बदलते. आईला सांभाळताना त्याची वैयक्तिक आयुष्यात फरफट होवू लागते. या सगळ्याला तो आईला जबाबदार ठरवत असतो.

जेव्हा आपले सगळे काही उद्ध्वस्त झाले आहे हे त्याच्या लक्षात येते तेव्हा तो आईवर हात उगारतो. त्यानंतर होणारा पश्चात्ताप, त्यातून निर्माण झालेली नात्याची जाणीव, त्यात नाते निभावणे आव दुरावलेल्या आईला पुन्हा मिळवण्याचा श्यामचा प्रवास म्हणजे हे नाटक सादर झाले.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

योगिता सावंत यांनी श्यामच्या आईची भूमिका निभावली. गणेश गावकर यांनी श्यामच्या भूमिकेला न्याय दिला. निर्मला टिकम, सुधीर कुर्ले, जान्हवी बिरमोळे यासह आद्या ओरसकर, अद्वैत टिकम, केतक देऊलकर, स्वरा पवार अनिमिष पवार या बालकलाकारांनी भूमिका साकारली. रूपेश नेवगी यांनी नेपथ्य सांभाळले. श्याम चव्हाण यांनी प्रकाश योजना सांभाळली. अक्षय धांगट यांनी संगीत दिले त्र माणिक कानडे यंनी रंगभूषा सांभाळली.

आज शीतयुद्ध सदानंद, विसर्जन

राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम आठवड्यात सोमवारी (ता.२०) श्याम मनोहर लिखित शीतयुद्ध सदानंद हे नाटक महाकवी कालिदास कलामंदिर येथे दुपारी ४ वाजता सादर होणार आहे.

परशुराम सायखेडकर नाट्यगृहात रात्री ८ वाजता दत्ता पाटील लिखित विसर्जन हे नाटक सादर होईल. औरंगाबाद येथील बजाज ऑटो कला व क्रीडा विभाग या संस्थेचे हे नाटक आहे.

टॅग्स :NashikdramaCompetition