Ramdan Eid 2023 : देशातील एकोप्यासाठी दुआ; शहरात रमजान ईद उत्साहात साजरी

Community prayer at the Eidgah grounds
Community prayer at the Eidgah grounds esakal

Nashik News : मुस्लिम बांधवांकडून रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. गोल्फ क्लब ईदगाह मैदान येथे शहर- ए- खतीब हिसामुद्दीन खतीब यांच्या नेतृत्वाखाली सामुदायिक नमाजपठण झाली. शहरासह देशात सुख, शांती आणि एकोपा नांदो, अशी दुआ या वेळी करण्यात आली. (Ramadan Eid 2023 was celebrated with enthusiasm by Muslim brothers nashik news)

रमजान पर्वातील महिनाभराचे रोजा मुस्लिम बांधवांनी पूर्ण करत शनिवारी (ता. २२) रमजान ईद साजरी केली. सकाळी दहाच्या सुमारास शहरातील गोल्फ क्लब येथील शहाजानी ईदगाह मैदानावर शहर- ए- खतीब हिसामुद्दीन खतीब यांच्या नेतृत्वाखाली हजारो मुस्लिम बांधवांनी ईदची सामुदायिक नमाजपठण केली. त्यांच्याकडून खुदबा पठण करण्यात आला.

त्यानंतर नमाज आणि फातिया पठण झाले. सलाम पठण करण्यात येऊन ईदच्या नमाजाची सांगता झाली. त्यांच्याकडून मुस्लिम बांधवांसह शहरवासीयांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. नमाजची सांगता होताच मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत ईद मुबारक म्हणत एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, खासदार हेमंत गोडसे, माजी महापौर दशरथ पाटील यांनी शहर- ए- खतीब यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांच्यासह पोलिस उपायुक्त विजयकुमार चव्हाण, चंद्रकांत खांडवी, प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, दीपाली खन्ना त्याचप्रमाणे माजी मंत्री शोभा बच्छाव, माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, माजी नगरसेविका हेमलता पाटील, गुलजार कोकणी आदी मान्यवरांनी उपस्थित राहत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Community prayer at the Eidgah grounds
Akshay Tritiya : शुभ मुहूर्तावर ‘सोनेरी’ झळाळी; दरात वाढ तरी खरेदीसाठी गर्दी!

ज्या मुस्लिम बांधवांना ईदगाह मैदानावर येणे शक्य नाही. अशा बांधवांसाठी शहराच्या विविध मशिदीमध्येही सकाळच्या सुमारास ईदच्या नमाजाची व्यवस्था करण्यात आली होती. कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, कुठला अनुचित प्रकार घडू नये. याची काळजी घेत पोलिस विभागाकडून ईदगाह मैदानसह परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परिसरातील इमारतीवरून शस्त्रधारी पोलिस दुर्बिणीच्या माध्यमातून संपूर्ण मैदानाची टेहेळणी करत होते.

रुग्णवाहिकांची व्यवस्था

काही दिवसांपूर्वी उष्माघातामुळे महाराष्ट्रभूषण कार्यक्रमातील काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. शहरातही प्रचंड उन्हाळा जाणवत आहे. ईदच्या नमाजासाठी ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधव नमाजपठण करण्यास येणार असल्यामुळे कोणास उष्माघाताचा त्रास जाणवल्यास वेळेवर उपचार मिळावे, यासाठी दोन रुग्णवाहिकांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती.

Community prayer at the Eidgah grounds
Phalke Smarak : फाळके स्मारकाच्या विविध शुल्कामध्ये दुप्पट वाढ! स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com