Ramadan Festival : उपासना, कृपा करण्याचा रमजान महिना; मशिदीची स्वच्छता, रंगरंगोटी कामांना वेग

The ongoing coloring of the mosque on the occasion of Ramadan
The ongoing coloring of the mosque on the occasion of Ramadanesakal

जुने नाशिक : इबादत (उपासना) आणि रहेमत (कृपा) करण्याचा महिना म्हणून रमजानला ओळखले जाते. इस्लाम धर्मात पाच स्तंभ सांगण्यात आले आहे. त्यातील एक स्तंभ रमजान महिन्यातील रोजा (उपवास) आहे. मोठ्या आतुरतेने मुस्लिम बांधव वर्षभर रमजान महिन्याची प्रतीक्षा करत असतात. (Ramadan month of worship grace preparation of festival nashik news)

अवघ्या काही दिवसांवर असा हा पवित्र महिना येऊन ठेपला आहे. रमजान पर्वात महिनाभर मुस्लिम बांधवांकडून विविध प्रकारची इबादत केली जाते. याच महिन्यात शब- ए-कद्रच्या रात्री पवित्र कुराण शरीफ धरतीवर अवतरले होते.

त्याचप्रमाणे मानव जातीची शुद्धी आणि गैर कृत्यापासून दूर जाण्यासाठी प्रवृत्त करणारा महिना असेही रमजान महिन्यास संबोधले जाते. संपूर्ण रमजान पर्व तीन अशरा (खंडात) विभागला गेला आहे. प्रत्येकी दहा दिवसांचा एक खंड असे विभाजन असते.

प्रत्येक मुस्लिम बांधवांवर रमजान पर्वातील रोजे अनिवार्य असतात. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यांना रोजा करण्यापासून तात्पुरती सवलत असते. त्याचदरम्यान सुटलेले रोजे अन्य दिवसात पूर्ण करण्याचे सांगण्यात आले आहे.

तसेच मुस्लिम बांधवांकडून संपूर्ण महिना इबदतमध्ये व्यतीत केला जातो. नमाज पठण, रोजा, कुराण पठण, तराविहीची विशेष नमाजाचे पठण करणे आदी प्रकारची इबादत केली जाते. या महिन्यात जन्नत अर्थात स्वर्गाचे दरवाजे महिनाभरासाठी उघडे असतात.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

The ongoing coloring of the mosque on the occasion of Ramadan
Inspirational Story | जिद्द : रामतीर्थाने दिली सुनीताताईंच्या आयुष्याला उभारी

पवित्र रमजान महिन्यानिमित्त मशिदीची स्वच्छता करत रंगरंगोटी करण्याच्या कामांना वेग आला आहे. रमजान पर्वात तराविहची विशेष नमाज पठन केली जाते. प्रत्येकी दोन रकात अशी २० रकात नमाज मशिदीमध्ये होते.

त्यात तोंडी कुराण शरीफ पठण केले जाते. ज्यांना कुराण पठण शक्य होत नाही, त्यांच्याकडून रमजान पर्वात मोलवीकडून तराविहच्या नमाज पठण दरम्यान केले जाणारे कुराण पठण आत्मसात केले जाते

रमजान पर्वाचे तीन खंड

पहिला खंड- रहेमत का (कृपा खंड)

पहिल्या खंडातील दहा दिवसांमध्ये अल्लाची सर्वांवर कृपा होत असते.

दुसरा खंड- मगफिरत का

कळत नकळत झालेली चूक सुधारण्याच्या उद्देशाने मुस्लिम बांधवांनी मनापासून इबादत केली की त्यावर अल्लाची कृपा होते. कळत नाही कळत झालेल्या पापापासून मुक्ती मिळते.

तिसरा आणि शेवटचा खंड जहन्नूमसे आजादी अर्थात नरकापासून मुक्ती मिळण्याचा काळ असतो.

The ongoing coloring of the mosque on the occasion of Ramadan
Ramadan Festival : मालेगावच्या बाजारपेठांना रमजानचे वेध!व्यापाऱ्यांकडून मालाची खरेदी; दुकाने सज्ज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com