Ramzan Festival : खजुराच्या दरामध्ये यंदा मोठी वाढ; इराण बम अन् अंगूरी खजूरला सर्वाधिक मागणी!

Different types of dates sold in the market.
Different types of dates sold in the market.esakal

जुने नाशिक : रमजाननिमित्त बाजारात विविध प्रकारची खजूर विक्रीस आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दरांमध्ये मोठी वाढ झाल्याने खजूरचा गोडवा महागाईने कडवडला आहे. इराण बम आणि अंगूरी खजूरला सर्वाधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. (Ramzan Festival Big increase in price of dates this year highest demand for Iran Bum and Angoori Dates nashik news)

यंदा १३ प्रकारचे खजूर बाजारात विक्रीस आले आहे. या सर्व प्रकारात इराण बमला सर्वाधिक मागणी आहे. त्यापाठोपाठ कलमी, जोडन कलमी, शाख, अंगूरी यांची अधिक विक्री होत असते. १०० रुपयांपासून ते १ हजार ६०० रुपयांपर्यंत खजूर विक्री होत आहे.

गेली दोन वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव विक्रीवर जाणवला यावर्षी मात्र नागरिकांचा खरेदीकडे चांगला प्रतिसाद आहे. देशात खजूर उत्पादनाचे प्रमाण अतिशय कमी आहे. शिवाय ठराविक प्रकारचीच विशेषतः कोरडी खजुराचे अधिक उत्पादन होत असते. तर नागरिकांची खजूरला होणारी मागणी लक्षात घेता.

विविध प्रकारच्या खजूर परदेशातून आयात केल्या जातात. गुजरात, मुंबई येथे परदेशातून खजूर दाखल होते. तेथून संपूर्ण देशात खजूर वितरित होत असते. सौदी येथील मदिना, दुबई, इराक, इराण येथून देशात खजूरचा पुरवठा होत असतो.

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

Different types of dates sold in the market.
Ramzan Festival : रंगबिरंगी सुत्तर फेणीने रमजानची बाजारपेठ बहरली! प्रतिकिलो 400 रुपयांना विक्री

खजूरचे प्रकार आणि दर

प्रकार दर

अजवा १ हजार ६००

मशरूफ ८००

बडी मदिना कलमी ८००

मदिना कलमी ६००

असवादी ५००

फरद ४००

जोडन शाख ४००

सुकरी ४००

इराण बम रसगुल्ला ३००

इराण मरियम कलमी ३००

अंगूरी २००

दुबई कच्ची पक्की १२०

साधी ओली खजूर १००

"गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा किलोमागे ४० ते ५० रुपयांची वाढ झाली आहे. सुमारे तेरा प्रकारची खजूर विक्रीस आली आहे. नागरिकांचाही खरेदीस प्रतिसाद मिळत आहे."

- याकूब सय्यद, विक्रेता

Different types of dates sold in the market.
Ramzan Festival : रमजान पर्वात मालेगावला खवय्यांची चंगळ! पूर्व भागातील उपहारगृहांवर लागले पडदे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com