esakal | डॉ. गेल ऑम्व्हेट यांचा वैचारिक प्रवास चमत्कारिक - रावसाहेब कसबे
sakal

बोलून बातमी शोधा

रावसाहेब कसबे

डॉ. गेल ऑम्व्हेट यांचा वैचारिक प्रवास चमत्कारिक - रावसाहेब कसबे

sakal_logo
By
तुषार महाले

नाशिक : व्यक्तिमत्वाचा लगेच दुसऱ्या व्यक्तीवर प्रभाव पडेल असे डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे व्यक्तिमत्त्व होते. सामंज्यस, विद्वान, पोक्त असलेली डॉ. गेल यांच्याशी साडेचार वर्ष सोबत काम करत असल्यामुळे वैचारिक प्रवास चमत्कारिक होता, अशी भावना ज्‍येष्ठ साहित्यिक रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केली. रावसाहेब कसबे यांनी डॉ. गेल ऑम्व्हेट यांना मरणोत्तर कॉ. गोविंद पानसरे जीवनगौरव पुरस्कार देण्यात येईल, अशी घोषणा केली.

ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, रावसाहेब कसबे कासेगावला जाऊन भारत पाटणकर यांना पुरस्कार सुपूर्द करतील, असे सांगितले. जागतिक कीर्तीच्या समाजशास्त्रज्ञ डॉ. गेल ऑम्व्हेट, प्रसिद्ध नाटककार जयंत पवार यांची स्मरणसभा गुरुवारी (ता.२) सार्वजनिक वाचनालयाच्या परशुराम सायखेडकर सभागृहात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. रावसाहेब कसबे म्हणाले, की मराठी भाषेतील मराठी नाटक परंपरेला एक नवीन दिशा, तसेच समृद्ध करण्याचे काम जयंत पवार यांनी केले आहे. त्यांचा नाट्य समीक्षकासह चळवळीशी सबंध होता. वेगळ्या विचारांचे समीक्षक म्हणून जयंत पवार यांच्याकडे बघितले जाईल. याप्रसंगी गंगाधर अहिरे, प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, बी. जी. वाघ, जयप्रकाश जातेगावकर, संजय करंजकर, राजू देसले, श्रीकांत बेनी आदींसह नाट्यक्षेत्रातील मंडळी उपस्थित होते.

हेही वाचा: ब्रह्मगिरी अवैध उत्खनन : पर्यावरण राज्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली

डॉ. ऑम्व्हेट यांनी महिलांचे संघटन केले : उत्तम कांबळे

स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधींनी महिलांचे संघटन केले होते. तसे प्रभावी संघटन महात्मा गांधी यांच्यानंतर डॉ. गेल ऑम्व्हेट यांनी केले. त्यांनी देशांसह महाराष्ट्रात अनेक चळवळी उभ्या केल्या, असे उत्तम कांबळे यांनी या वेळी सांगितले. डॉ. ऑम्व्हेट यांनी आंदोलनाला संस्कृतीची जोड देण्याचे काम केले होते. कोयना धरणाची चळवळ डॉ. ऑम्व्हेट यांनी उभी केली करत धरणग्रस्तांसाठी त्या आधार ठरल्या. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, सत्यशोधक समाजाचा त्यांनी अभ्यास केला. समाजाच्या छोट्या घटकांमध्ये जाऊन त्यांनी संघटन उभे केले. महिलांसाठी सिता शेती नावाची संकल्पना आणत त्यांनी तुकारामांचे अभंग इंग्रजीत अनुवाद करून वैश्‍विक केले. डॉ. ऑम्व्हेट यांनी एकही पद स्वीकारले नाही.

हेही वाचा: २७ हजारांची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षकासह दोघांना अटक

loading image
go to top