Nashik Crime News : लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; 5 लाखांनाही फसवविले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

Nashik Crime News : लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; 5 लाखांनाही फसवविले

नाशिक : प्रेमसंबंधातून लग्न करण्याचे आमिष दाखवून संशयिताने गेल्या दहा वर्षांपासून पीडितेवर लॉजवर नेऊन अत्याचार केला.

तसेच घर, वाहने घेण्यासाठी सुमारे साडेचार लाखांचा गंडा घातला. मुंबई नाका पोलिसात संशयित शोएब नासिर शेख (३५, रा. मदिना चौक, नाशिक) याच्याविरोधात बलात्कारांसह मारहाण, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Rape by luring marriage 5 lakhs were also cheated Nashik Crime News) पीडितेच्या

फिर्यादीनुसार, पीडित व संशयित यांच्यात २०११ पासून ते आत्तापर्यंत प्रेम संबंध होते. संशयिताने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून मदिना चौकातील राहत्या घरी, सापुतारा, मुंबई, त्र्यंबकेश्रर येथे लॉजिंगमध्ये नेऊन अत्याचार केला.

तसेच, मारहाणही केली. तसेच, घरासाठी तीन लाख रुपये, बुलेट घेण्यासाठी ८० हजार रुपये व ॲक्सेस दुचाकी घेण्यासाठी ८० हजार रुपये घेऊन पीडितेची फसवणूक केली. सदरची गुन्ह्याचा सहायक निरीक्षक गेंगजे हे तपास करीत आहेत.

टॅग्स :Nashikcrimerape news