Farmer Protest : कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा राज्यमार्गावर रास्ता रोको | Rasta Roko protest of Onion Producers farmers on State Highway nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rasta roko  protest by onion producer farmer

Farmer Protest : कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा राज्यमार्गावर रास्ता रोको

Nashik News : करंजाड येथील उपबाजार समितीत कांदा लिलाव दरम्यान नवीन व्यापा-याने सहभाग घेतल्याने स्थानिक व्यापा-यांनी लिलाव बंद पाडल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत थेट विंचूर प्रकाशा राज्यमार्गावर उतरून रास्ता रोको आंदोलन छेडले व व्यापारी धार्जित बाजार समितीविरोधात घोषणाबाजी केली. (Rasta Roko protest of Onion Producers farmers on State Highway nashik news)

या रास्ता रोकोमुळे दुतर्फा वाहतूक ठप्प झाली असून जायखेडा पोलिस प्रशासन दाखल झाले आहे. कांदा उत्पादक शेतक-यांत स्थानिक व्यापा-याविरोधात संताप व्यक्त केला जात असून बाहेरील येणा-या व्यापारी वर्गालाही लिलावा दरम्यान सहभागी करून घ्यावे यामुळे शेतक-यांच्या पदरी दोन पैसे मिळतील अशी अपेक्षा उपस्थित शेतक-यांतून व्यक्त होत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?