
Vishwas Bank Election: विश्वास को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी ठाकुरांची फेरनिवड!
Vishwas Bank Election : विश्वास को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच झाली. गेल्या २६ वर्षांपासून बिनविरोध निवडणुकीची परंपरा बँकेने कायम ठेवली. बँकेच्या अध्यक्षपदी विश्वास ठाकूर यांचे फेरनिवड करण्यात आली.
तसेच, उपाध्यक्षपदी अजित मोडक यांची बिनविरोध निवड झाली. (Re election of Thakur as President of Vishwas Co operative Bank election nashik news)
जिल्हा उपनिबंधक मनीषा खैरनार यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. अध्यक्षपदासाठी श्री. ठाकूर यांच्या सूचक मंगला कैलास कमोद, तर अनुमोदक घनःश्याम येवला हे होते. श्री. मोडक यांच्या नावाचे सूचक विलास हावरे, तर अनुमोदक मंगेश पंचाक्षरी हे होते.
बिनविरोध निवडून आलेल्या संचालक मंडळात श्री. हावरे, श्री. पंचाक्षरी, श्री. येवला, डॉ. वासुदेव भेंडे, कैलास पाटील, डॉ. चंद्रकांत संकलेचा, शशिकांत पारख, विक्रम उगले, वैशाली होळकर, सौ. कमोद, सुभाष पवार यांचा समावेश आहे.
श्री. ठाकूर म्हणाले, बँकेच्या वाटचालीत संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी वर्गाने केलेल्या कष्टाचे फळ आहे. ‘टीम वर्क’च्या भावनेतून कार्यरत राहिल्यास स्वप्नवत कार्य सिद्धीस जाते, या उक्तीनुसार विश्वास बँकेची रौप्य महोत्सवानंतरची वाटचाल सुरू आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
बँकेची आर्थिक स्थिती
० ३१ मार्च २०२३ अखेर सभासद संख्या-९ हजार ८७८
० ठेवी-५०५ कोटी ६ लाख रुपये
० कर्जवाटप-३२५ कोटी ३४ लाख रुपये
० सी. एस. ए. आर.-१३.२२ टक्के
० नेट एन. पी. ए.-०.५६ टक्के
० बँकेच्या शहरात ११ शाखा असून सातपूरमध्ये १२ वी शाखा सुरु होत आहे.