आमरसाच्या पंगतींचे स्वरूप घरापुरते आणि आटोपशीर...

Readymade Mango juice and Mande in making
Readymade Mango juice and Mande in makingesakal

देवळा (जि. नाशिक) : ग्रामीण भागात शेतीमालास त्यात खास करून कांद्याला भाव नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक गणिते बिघडली आहेत. त्यामुळे आमरसाच्या (Mango Juice) पंगती कमी होत आहेत. गहू- हरभऱ्याचे भरघोस उत्पादन न झाल्याने व मांडे बनविण्याची कला कमी होऊ लागल्याने आटोपशीर व घरापुरता आमरस (आंबाजीव) करण्याकडे मंडळींचा कल दिसून येत आहे. तर, काही मंडळी रेडिमेड मांड्यांना पसंती देत जीभेचे चोचले पुरवत आहे. (readymade mande and mango juice trending nowadays during festival time Nashik News psl98)

दरवर्षी पितरांना आमरस पुरणपोळीचा सवाष्ण घास (नैवेद्य) देण्यासाठी हा आमरसाचा कार्यक्रम प्रत्येक घरी केला जातो. तसेच, या दिवसात ग्रामीण भागातील प्रत्येक घरी आमरसाच्या पंक्ती दणक्यात होत असत. शहरात पुरणाच्या पोळ्या अर्थात मांडे करणे चुलीच्या अभावामुळे अशक्य होते. तर काहीवेळा मांडे करण्याची कला ग्रामीण भागातील महिलांनाच खास करून जमते. मग अशावेळी भाऊबंद, सगेसोयरे, मित्रमंडळी, शेजारी तसेच शहरातील मंडळीला आमंत्रित करून आमरसाची पंगत उठवणे म्हणजे एक आनंदसोहळाच! मांडे खाणाऱ्या खवैय्यांची पर्वणीच. परंतु, यंदा मात्र शेतमालाच्या अल्प दरामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे.

शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. यावर्षी गहु व हरभऱ्याचे उत्पादन नसल्याने पोळ्या बनविण्यासाठी कच्चे मटेरियल घरात नाही. त्यामुळे आमरसाचे कार्यक्रम आता थोडक्यात व घरच्या घरीच उरकवले जात आहेत. यावर्षी आंब्याचे भाव किमान ९० रुपये ते कमाल १००- १४० रुपयांपर्यंत आहेत. नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा बाजारात येऊ लागला असला तरी महाग आंबा घेणे परवडत नाही. अशा कात्रीत शेतकरी वर्ग सापडला आहे. त्यामुळे इच्छा असूनही आमरसाच्या कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या स्वरूपात शक्य होत नसल्याचे चित्र आहे.

Readymade Mango juice and Mande in making
नामपूर बसस्थानकाची झाली कचराकुंडी; प्रवाशांना मन:स्ताप

मांडे बनविण्याच्या उद्योगाची चाहूल

आमरसाच्या पंगतीतील खास मेनू म्हणजे खापरावरच्या पोळ्या (मांडे). हे मांडे बनविण्याचे कौशल्य काही महिलांनाच जमते. त्यामुळे या काळात अशा सुगरणींना विशेष मागणी असते. खापरावरचे मांडे तयार करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे गहू धुणे, वाळवणे, जात्यावर दळणे, पातळ कापडावर चाळणे, यातून तयार झालेल्या पिठाची कणिक बनवणे, कणकेच्या योग्य आकारमानाच्या पोळ्या लाटून त्यात शिजवलेली हरभरा डाळ व गुळ एकत्र करून टाकतात. त्यानंतर मोठ्या कौशल्याने खापरावर मांडे बनविले जातात. या भागात ६० रुपयाला एक मांडा याप्रमाणे खरेदी- विक्री केली जाते.

मांडे बनविण्याच्या या अनोख्या व्यवसायात काही घरगुती स्वरूपात, तर काही केटरर्स उतरले आहेत. यामुळे शहरी भागातील मंडळींची सोय झाली आहे. लग्न झालेल्या घरी पाहुण्यांची वर्दळ असल्याने जास्त करून आमरसाचाच बेत आखला जातो. त्यासाठी तयार मांडे घेण्याकडे कल वाढला आहे.

Readymade Mango juice and Mande in making
सकाळ यिन समर यूथ समीट 2022 चा उद्‍घाटन सोहळा; पाहा Photos

"आमच्या घरी लहान- मोठे सारेच मांडे करण्याच्या कामात मदत करत असल्याने आम्ही मोठ्या कार्यक्रमातही मांड्यांसह आमरसाचे जेवण देत असतो. या दिवसांत आमरसाच्या जेवणाला जास्त पसंती दिली जाते."

- दिनकर भदाणे, दावल भदाणे, राम केटरर्स, माळवाडी (ता. देवळा)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com