मालेगावात विक्रमी तापमान...; उन्हामुळे नागरिकांना विविध समस्या

सुर्यनारायणाच्या प्रकोपाने मालेगाव शहर व परिसर तप्त झाला आहे.
temprature
tempratureesakal

मालेगाव (जि. नाशिक) : सुर्यनारायणाच्या प्रकोपाने शहर व परिसर तप्त झाला आहे. शहरात सोमवारी (ता.४) या हंगामातील सर्वाधिक विक्रमी ४३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यामुळे शहरवासियांवर ऊन हे जुल्मी गडे म्हणण्याची वेळ आली आहे. पत्र्याच्या खोल्या व वरच्या मजल्यावरील रहिवासी उकाड्याने हैराण झाले आहेत. नागरिकांना उन्हाच्या झळा असह्य झाल्या होत्या तर दुपारी रस्त्यावर अक्षरश: शुकशुकाट पसरला होता.

मालेगावात विक्रमी तापमान...

शहर व परिसराने यापुर्वी गुरुवारी (ता.३१) विक्रमी तापमान अनुभवले. ३१ मार्चला ४३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. गेली तीन दिवस पारा थोडासा उतरला असला तरी ४३ अंश सेल्सिअसपेक्षा अधिकच होता. तापमानात विक्रमी वाढ झाल्याने दुपारी सुर्यदेवता आग ओकताना जाणवली. रस्त्यांवर अघोषित संचारबंदी जाणवत होती. विशेष व महत्वाच्या कामानिमित्त दुचाकीवर घराबाहेर पडलेले नागरिकही काही अंतर प्रवास केल्यानंतर झाडाची सावली शोधत होते. घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येकाच्या डोक्यावर हमखास टोपी, उपरणे, गॉगल आढळून येत होता.

temprature
नाशिकचे तापमान यंदा एप्रिलमध्येच चाळीशीपार..!

उन्हामुळे नागरिकांना विविध समस्या

उन्हामुळे अनेकांना त्वचेचा त्रास जाणवत होता. ओठ व घसा वारंवार कोरडा पडत होता. अनेक तरुणांच्या हाताला तडे जाऊन कातडी व बोटे सोलली जात होती. मार्च अखेरपासूनच तापमान ४३ अंशावर स्थिरावले आहे. एप्रिल व मे या दोन महिन्यात तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची भीती वर्तवली जात आहे. सायंकाळी सातपर्यंत उकाडा व उन्हाच्या झळा जाणवत होत्या.

temprature
नाशिक : सिटीलिंकसाठी महिला तिकीट तपासनीस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com