
Nashik Crime: मुन्नाभाई स्टाईल कॉपी करताना पकडले रंगेहाथ; नाशिकमध्ये घडला प्रकार
नाशिक : मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटाच्या कथेत ज्याप्रकारे कॉपी करण्याचे प्रकार दाखविला होता. तसाच प्रकार (Nashik) नाशिकमध्ये घडला असून छत्रपती संभाजीनागरच्या या मुन्नाभाईला पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे. (Red handed caught copying Munnabhai style in PCMC Exam in Nashik Crime)
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लिपिक व इतर पदांच्या भरतीसाठी नाशिकमध्ये रविवारी घेतलेल्या परीक्षेचा पेपर नाशिकच्या केंद्रावर फुटल्याची घटना घडली. बटन कॅमेरा व ब्ल्यूटूथ या तंत्रज्ञानाच्या साह्याने हा गैरप्रकार केल्याचा संशय परीक्षा केंद्रावर उघडकीस आला.
परीक्षा देणारा मूळ उमेदवार त्यांच्या जागी परीक्षा देणाऱ्या डमी परीक्षार्थी व उत्तर पुरवणाऱ्या अशा तीन संशयिताविरोधात विरोधात नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे तिघेही छत्रपती संभाजी नगर (Sambhajinagar) जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली आहे.

नाशिक रोड येथील आर्टिलरी सेंटर भागातील फ्युचर टेक सोल्युशन केंद्रावर ही परीक्षा सुरू होती. अर्जुन मेहेर या परीक्षार्थीच्या जागेवर राहूल नागलोथ या डमी उमेदवाराने परीक्षा दिली. त्याने बटन कॅमेरा आणि ब्लूटूथच्या साह्याने प्रश्नपत्रिका फोटो बाहेर पाठवला आणि केंद्राबाहेर उभ्या असलेल्या अर्जुन राजपूत याने प्रश्नांची माहिती दिली.
त्यामुळे पोलिसांनी राजपूत आणि नागलोथ याला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी उपनगर पोलीस ठाणे करत आहे. परीक्षेचे हे रॅकेट अजून मोठे असल्याचा संशय देखील पोलिसांकडून व्यक्त केला जात असून लिपिक पदाच्या परीक्षेसाठी आलेल्या सर्व परीक्षार्थींची चौकशी करण्यात येत आहे.