MBA-CET Exam : एमबीए-सीईटी परीक्षेच्‍या नोंदणीची या तारखेपर्यंत मुदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 MBA

MBA-CET Exam : एमबीए-सीईटी परीक्षेच्‍या नोंदणीची या तारखेपर्यंत मुदत

नाशिक : व्‍यवस्‍थापनशास्‍त्र शाखेतील एमबीए/एमएमएस या पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी येत्‍या १८ व १९ मार्चला सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेकरिता अर्ज भरण्याची प्रक्रिया गुरुवार (ता. २३) पासून सुरू होत असून, पात्र उमेदवारांना ४ मार्चपर्यंत अर्ज भरता येईल. (Registration deadline for MBA CET exam till 4 march nashik news)

व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशाचे कोलमडलेले वेळापत्रक शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये वेळीच होऊन प्रवेशप्रक्रिया पूर्ण होण्याच्‍या आशा पल्लवित झालेल्‍या आहेत.

यापूर्वीच राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून विविध अभ्यासक्रमांच्‍या सीईटी परीक्षांचे संभाव्‍य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. आता एमबीए अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी महत्त्वाच्‍या तारखांची घोषणा सीईटी सेलकडून करण्यात आलेली आहे.

उपलब्‍ध माहितीनुसार शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या एमबीए/एमएमएस या व्यावसायिक पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी २०२३ ही सामाईक प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणीप्रक्रिया गुरुवार (ता. २३) पासून सुरू होत आहे. विद्यार्थ्यांना ४ मार्चपर्यंत परीक्षा अर्ज भरता येतील.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

मार्चपासूनच परीक्षांचा धडाका

गेल्‍या वर्षी २०२२-२३ च्‍या प्रवेशाकरिता व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या सीईटीसाठी विलंब झालेला होता. अगदी ऑगस्‍टनंतर या परीक्षा पार पडल्या होत्‍या.

परंतु आता मार्च महिन्‍यापासून विविध शिक्षणक्रमांच्‍या सीईटी परीक्षांचा धडाका सुरू होत असून, मे महिन्‍यांपर्यंत टप्प्‍याटप्प्‍याने व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या सीईटी परीक्षा पार पडतील. यातून जून-जुलै महिन्‍यात प्रत्‍यक्ष प्रवेशप्रक्रिया राबविणे सुलभ होणार आहे.

टॅग्स :NashikexamMBA-CET