Nashik Crime News: कोरोनात पॅरोलवर सुटला पण कारागृहात परतलाच नाही; घरफोडीच्या आरोपीला पेठमधून अटक

suspect arrested
suspect arrestedesakal

Nashik Crime News : घरफोडीच्या गुन्ह्यात दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलेला आरोपीला कोरोना काळात अभिवचन रजेवर सोडण्यात आले. मात्र मध्यवर्ती कारागृहात तो परतलाच नाही.

फरार असलेल्या या शिक्षाबंदीला शहर गुन्हेशाखेच्या गुंडाविरोधी पथकाने पेठ तालुक्यातील ननाशीतून अटक केली. याप्रकरणी उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. (released on parole in corona never returned to jail accused arrested from Peth Nashik Crime News)

अजय सुनील वडनेरे (३१, रा. नंदन व्हॅली, उपनगर) असे आरोपीचे नाव आहे. २०१६ मध्ये लासलगाव येथील घरफोडीच्या गुन्ह्यात त्यास अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यास दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती.

दरम्यान, नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात तो शिक्षा भोगत असतानाच कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला. त्यामुळे त्यास कोवीड-१९ अभिवचन रजेवर सोडण्यात आले होते.

१६ जून २०२२ रोजी त्याने मध्यवर्ती कारागृहात पुन्हा हजर होणे आवश्यक असताना तो हजर झाला नाही. त्यामुळे उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

suspect arrested
Nashik Crime : पोलिस सध्या करताय तरी काय? भरदिवसा बॅग लिफ्टिंग, चैनस्नॅचिंग

दरम्यान, शहर गुन्हेशाखेच्या गुंडा विरोधी पथकाचे अंमलदार गणेश भागवत यांना आरोपी वडनेरे हा पेठ तालुक्यात लपून वास्तव्याला असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार गुंडा विरोधी पथकाने सापळा रचून पेठ तालुक्यातील ननाशी गावातील आयटीआयजवळ आरोपी वडनेरे यास अटक केली.

प्राथमिक तपास करून त्यास उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी गुंडा विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, अंमलदार मलंग गुंजाळ, डी.के. पवार, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, राजेश सावकार, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, मिलिन जगताप, गणेश नागरे आदींनी बजावली.

suspect arrested
Jalgaon Bribe Crime : बांबरुड तलाठी कार्यालयात लाच घेताना ‘पंटर’ला अटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com