esakal | कौतुकाची थाप मारण्यासाठी भरपावसात 'त्यांनी' गाठले सुनंदाचे घर!
sakal

बोलून बातमी शोधा

Sunanda-first-in-SSC-exam-in-Igatpuri-taluka

कौतुकाची थाप मारण्यासाठी भरपावसात त्यांनी गाठले सुनंदाचे घर!

sakal_logo
By
सकाळ वृत्त सेवा

इगतपुरी (जि. नाशिक) : तालुक्यातील दुर्गम व आदिवासी डोंगराळ भागातील पत्र्याची वाडी (त्रिंगलवाडी) येथील सुनंदा शिवाजी आगिवले दहावीच्या परीक्षेत ९८.६० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम आली. या निमित्ताने सुनंदाच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी इगतपुरीचे सभापती सोमनाथ जोशी व गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड व गटशिक्षणाधिकारी राजेश तायडे यांनी संततधार व भरपावसात सुनंदाचे घर गाठत तिचा सत्कार केला.

(Remote-and-tribal-areas-Sunanda-first-in-SSC-exam-in-Igatpuri-taluka)

सुनंदाच्या शैक्षणिक परिस्थितीची माहिती विशद केली

विजय पगारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या वेळी सुनंदाच्या कौटुंबिक परिस्थितीबद्दल पत्र्याची वाडी शाळेचे मुख्याध्यापक सचिन कापडणीस यांनी माहिती दिली. सुनंदाला दत्तक घेतलेल्या दत्तात्रेय दातीर यांनी शैक्षणिक परिस्थितीबद्दल माहिती विशद केली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सचिन कापडणीस, भाऊराव बांगर, रोहिदास जाखेरे, दीपमाला तोरवणे यांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा: इंदापुरच्या उच्चशिक्षित अंगदची जिरेनियमची सुगंधी शेती; दुष्काळात वरदान

रोख स्वरूपात बक्षिसे देऊन कौतुकाचा वर्षाव

आदिवासी शिक्षक संघटना, प्राथमिक शिक्षक समिती, प्राथमिक शिक्षक संघ या संघटनांकडून रोख स्वरूपात बक्षिसे देऊन कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. याप्रसंगी सरपंच अशोक पिंगळे, गटशिक्षणाधिकारी राजेश तायडे, शिक्षण विस्ताराधिकारी कैलास सांगळे, शिवाजी आहिरे, योगेश भामरे, निवृत्ती तळपाडे, प्रकाश सोनवणे, विजय पगारे, सचिन कापडणीस, सुनील सांगळे, दत्तात्रेय दातीर, कैलास भवारी, निवृत्ती नाठे, भिला आहिरे, भाऊराव बांगर, कैलास भवारी, लहानू लोटे, तुकाराम सारुकते, ग्रामसेविका एस. आर. शिंदे यांच्यासह शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

(Remote-and-tribal-areas-Sunanda-first-in-SSC-exam-in-Igatpuri-taluka)

हेही वाचा: पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णयश मिळविण्याचा ‘सुयश’चा निश्‍चय!

loading image