Child Labor : नाशिक ग्रामिण पोलिसांच्या पुढाकाराने बालमजुरांची सुटका

A member of a special team that rescues children trapped in the trap of child labour.
A member of a special team that rescues children trapped in the trap of child labour. esakal

Nashik News : नाशिक ग्रामिण पोलिसांनी पुढाकार घेत बागलाण तालुक्यात दोन बालमजुरांची सुटका केली आहे. याप्रकरणी दोन संशयितांवर सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Rescue of child laborers at initiative of Rural Police nashik news)

नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी बाल मजुरीच्या विरोधात अधिकारी आणि अंमलदार यांचे विशेष पथक गठित केले आहे. या पथकाने जिल्ह्याच्या आदिवासी भागात, अतिदुर्गम वाड्या, वस्त्या, गावांना भेटी देत स्थानिक पोलीस पाटील, आदिवासी समाजातील प्रतिष्ठित नागरिक, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची मदत घेत बालमजुरीविषयी प्रबोधन करण्यास सुरवात केली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

A member of a special team that rescues children trapped in the trap of child labour.
SAKAL Exclusive : संशयास्पद गळतीची दखलही कुणी घेईना!

या मोहिमेदरम्यान महाराष्ट्र दिनी पथकाला बागलाण तालुक्यात कामावर असलेल्या दोन बालमजुरांविषयी माहिती मिळाली.

ठेंगोडा शिवारात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारानजीक एका शेतात शेळ्या, मेंढ्या चारण्याचे काम करणाऱ्या या दोन बालकांची चाईल्ड हेल्पलाईन, जिल्हा महिला व बाल विकास विभाग यांच्या प्रतिनिधींच्या मदतीने सुटका करण्यात आली. या ठिकाणी संशयित संभाजी पाकळे, नंदलाल पाकळे यांच्याविरुद्ध बालकामगार अधिनियमन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

A member of a special team that rescues children trapped in the trap of child labour.
Child Marriage : बालविवाहात सोलापूर राज्यात ‘अव्वल’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com