संशोधन पुस्तकी नको, प्रायोगिक असावे.- वैद्यकिय शिक्षणमंत्री अमित देशमुख

amit deshmukh 1.jpg
amit deshmukh 1.jpg

नाशिक : आरोग्य विद्यापीठात संशोधन पुस्तकी नको, प्रायोगिक असावे. याकरीता जगातील वैद्यकिय क्षेत्रातील विद्यापीठांचा अभ्यास करा अशा सूचना केल्या. जगातील नामांकित विद्यापीठांपैकी एक म्हणून या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा नावलौकिक व्हावा यादृष्टीने शासन स्तरावरून देखील लवकरात लवकर पाउले उचलली जातील असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकिय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केले. आरोग्य विद्यापीठाच्या प्रशासकिय इमारतीच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ, आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, डॉ. तात्याराव लहाने, प्रा. मोहन खामगांवकर, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, डॉ. कालिदास चव्हाण आदी उपस्थित होते. 

कोरोनाची महामारीनंतर अनंत अडचणींना तोंड

अमित देशमुख म्हणाले की, कोरोनाची महामारीनंतर अनंत अडचणींना तोंड देत आहोत. विद्यापीठात अभ्यासक्रम कसे राबवावे, परिक्षा कशा घ्याव्यात यातून मार्गक्रमण करत आहोत. परंतु वैद्यकिय शिक्षणात अनंत अडचणी येउनही त्यावर मात केली. परिक्षाबाबत मतमतांतर होती. याकरीता जगाचा अभ्यास केला. तेव्हा असे जाणवले कि, या परिक्षा घेणे क्रमप्राप्त आहे. राज्यातील वैद्यकिय शिक्षणातील विद्यार्थ्याला जगाशी स्पर्धा करावी लागणार आहे. त्यामुळे जगाशी स्पर्धा करतांना आपल्यालाही त्यांच्याप्रमाणेच पाउले टाकावी लागतील आणि त्या दृष्टीने आम्ही नियोजन केले. 

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठात आरोग्य विद्यापीठाचे ओळख असेल

वैद्यकिय शिक्षणमंत्री महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे देशातील उच्च दर्जाचे एक विद्यापीठ आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या विद्यापीठाचा नावलौकिक कसा होईल या दिशेने आम्ही पाउले टाकत आहोत. मला खत्री आहे आगामी काळात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठात आरोग्य विद्यापीठाचे नाव घेतले जाईल. 

राज्यपालांचे विशेष आभार
 यावेळी देशमुखांनी राज्यपालांचे विशेष आभार मानले तसेच मी जेव्हा जेव्हा आपणांकडे येतो तेव्हा आपण भरभरून मदत करतात. जी दिशा देतात त्यामुळे विद्यापीठाची आगेकुच करण्यात बळ प्राप्त होते. सौरउर्जा प्रकल्प ही त्यांची कल्पना आहे. हा प्रकल्प म्हणजे सुरूवात आहे. हे विद्यापीठ नव्हे उर्जा पीठ व्हावे यादृष्टीने यापुढे पावले टाकले पाहीजे. विद्यापीठाला बाहय उर्जा घेण्याची आवश्यकता भासू नये आंतरिक उर्जा येथे तयार व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com