esakal | पर्यायी घर द्या नाहीतर जागा द्या; पोलिस लाइन मधील रहिवाशांचा विरोध

बोलून बातमी शोधा

police line
पर्यायी घर द्या नाहीतर जागा द्या; पोलिस लाइन मधील रहिवाशांचा विरोध
sakal_logo
By
हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक रोड : नाशिक रोड पोलिस स्टेशनच्या (Nashik road police station) आवाराजवळ असणाऱ्या पोलिस लाइन (police) मधील रहिवाशांचा क्वार्टर सोडण्यास विरोध असून शासनाने पर्यायी जागा अथवा घर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी ४० कुटुंबांनी केली आहे. आजपर्यंत शासनाच्या बांधकाम विभागाने सात नोटिसा पाठवल्या आहेत. मात्र पर्यायी जागा जोपर्यंत उपलब्ध होत नाही, तोपर्यंत आम्ही कुठेही जाणार नाही, असा पवित्रा येथील रहिवाशांनी घेतला आहे. (police line resident protest)

हेही वाचा: VIDEO : नाशिकमध्ये 'म्‍युकोरमायकोसिस'चे नवे संकट; मधूमेह बाधितांना सावधगिरीचा इशारा

स्थलांतरित होण्यासाठी पोलिस लाइन मधील ४० रहिवाशांचा विरोध

नाशिक रोड पोलिस ठाण्याच्या जवळ शासकीय कर्मचारी निवासस्थाने आहेत. काही कर्मचारी निवृत्त झाले असून विविध आस्थापनांत काहीजण अजूनही कार्यरत आहेत. हे कर्मचारी रीतसर घरभाडे, वीज बिल भरत आहेत ,असे असताना खोल्या जीर्ण झाल्याच्या नावाखाली त्या निर्लेखित(पडण्याचे) करण्याचे काम हाती घेण्यात आली आहे. येथील कर्मचाऱ्यांना आठ दिवसात घरे खाली करण्याची नोटीस आली आहे. ही घरे सोडण्यास कर्मचाऱ्यांचा विरोध नाही, मात्र घरे सोडल्यानंतर पर्यायी शासकीय निवासस्थाने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर उभारण्याचे नियोजन बांधकाम विभागाने हाती घेतलेले असल्याचे येथील रहिवासी सांगत आहेत.

हेही वाचा: ग्राउंड रिपोर्ट : राज्याच्या सीमा बनल्या कोरोना स्प्रेडर्स

कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री बांधकाम विभाग यांचे दरवाजे ठोठावले

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या हे आंदोलन पेट घेत असून ३९ कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री बांधकाम विभाग यांचे दरवाजे ठोठावलेले आहे. मात्र त्यांच्या पदरी अजूनही निराशाच येत आहे. यापूर्वी शासनाने शासकीय घरे खाली केल्यानंतर तेथील कुटुंबांना घरे भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिली आहे, मात्र येथील कुटुंबांना सध्या घरासाठी संघर्षच करावा लागत आहे. (police line resident protest)