esakal | नाशिकमध्ये 'या' तालुक्यात होणार कडक लॉकडाऊन; छगन भुजबळांचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

nashik lockdown

नाशिकमध्ये 'या' तालुक्यात निर्बंध वाढणार - भुजबळांचा इशारा

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : जिल्ह्यात कोरोना (coronavirus) सौम्य झाला असला तरी 3 तालुक्यात मात्र कोरोनाच्या रुग्णांची संख्या मात्र वाढत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा आणि पाउस नुकसानीबाबत बैठक झाली. यावेळी नवरात्रोत्सवात या तालुक्यातील स्थिती पाहून त्यानंतर या तिन्ही तालुक्यातील निर्बंध आणखी कडक केले जातील. असा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी दिला.

नवरात्रोत्सवानंतर होणार निर्णय, प्रसंगी बाजार समित्या बंद

नवरात्रोत्सवात या तालुक्यातील स्थिती पाहून त्यानंतर निफाड, सिन्नर आणि येवला या तिन्ही तालुक्यातील निर्बंध आणखी कडक केले जातील. प्रसंगी मोठ्या बाजार समित्यांचे कामकाज बंद ठेवण्याचा विचार केला जाईल. असा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला. भुजबळ म्हणाले जिल्ह्यातील कोरोना वाढत असलेल्या तालुक्यातील होम क्वारंटाईन राहून घरीच उपचार घेण्याची पध्दत तातडीने बंद केली जात आहे. नवरात्रोत्सवात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास त्यावर लक्ष ठेउन प्रसंगी तिन्ही तालुक्यातील बाधीत गावात निर्बंध आणखी कडक करण्याचा विचार करावा लागेल. जिल्हा यंत्रणेने गृह विलगीकरणात असलेल्या व्यक्तींची तपासणी करून त्या ठिकाणी गृह विलगीकरणाचे सर्व नियम पालन करण्यात येत असल्याची खात्री करावी अन्यथा सदर रुग्णास नजिकच्या कोरोना केंद्रात दाखल करावे. कोरोना रिपोर्ट येईपर्यंत संबंधित व्यक्ती विलगीकरणात राहील याबाबत स्थानिक प्रशासन व आरोग्य विभाग यांनी दक्षता घ्यावी.

विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, आमदार प्रा.देवयानी फरांदे, डॉ. राहूल आहेर, सिमा हिरे, नितीन पवार, नरेंद्र दराडे, हिरामण खोसकर, सुहास कांदे, सरोज आहिरे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दीपक पांडे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जि.प. मुख्य कार्यकारी आधिकारी लीना बनसोड, पोलिस अधीक्षक सचिन पाटील आदीसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा: ...अन् भल्या पहाटे अजित पवार धरणाच्या मधोमध अडकले!
बैठकीत सूचना
दरम्यान, जिल्हाधिकारी मांढरे यांनी, बैठकीत विविध सुचना केल्या. त्यात, प्रवासावर बंधने शिथिल झाल्यानंतर नागरिकांचा मुक्तसंचार तालुक्यात व जिल्हा स्तरावर होत आहे. सर्वांवर सरसकट बंधने आणणे अव्यावहारिक असल्यामुळे त्यापैकी नेमके कोविड संसर्गाचा दृष्टीने संवेदनशील क्षेत्रात कोठून नागरिक जात आहेत अथवा कोणत्या कारणासाठी जात आहेत याची व्यवस्थित शहानिशा करून, योग्य प्रकारे हॉटस्पॉट ठरवून त्या हॉटस्पॉट कडे विशेष लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे हे तत्त्व लक्षात ठेवावे. शेजारील बाधित जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये येत असलेले नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणात येत आहेत ते हॉटस्पॉट निश्चित करावेत व त्या ठिकाणी देखील प्रतिबंधात्मक सर्व काळजी घेतली जात असल्याची खात्री करावी. सर्व आस्थापनाकडून कोरोना प्रतिबंधासाठी सर्व उपाय योजनांची अंमलबजावणी करत असल्याबाबतचे प्रमाणपत्र घ्यावे.

हेही वाचा: नाशिकमध्ये शंभर टक्के लसीकरणासाठी ‘कवच-कुंडल’ मोहीमहॉट स्पॉट निश्चिती
ग्राहकांची संख्या जास्त असलेल्या सर्व आस्थापनांमध्ये थर्मल गन व पल्स ऑक्सीमीटर द्वारे ग्राहकांची तपासणी करावी व त्याबाबतचे रजिस्टर ठेवावे. तसेच लक्षणे असलेले नागरिक अशा ठिकाणी आढळून आल्यास त्यांना टेस्ट साठी रॅट केंद्राकडे पाठवण्याच्या सूचना संबंधित आस्थापना चालकांना द्याव्यात. कॉन्टॅक्ट टेसिंग मध्ये एखादी अस्थापना वारंवार येत असल्याचे निदर्शनास आले तर संबंधित अस्थापना बंद करण्याची कार्यवाही करावी.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मध्ये येणाऱ्या व्यक्तींची कोविड चाचणी करणे बंधनकारक आहे. प्रत्येक तालुक्याने हॉट स्पॉट निश्चित करून तेथे फिरणाऱ्या व लक्षणे असणाऱ्यांची टेस्ट करून घेण्याची व्यवस्था त्या हॉटस्पॉट च्या आस्थापना चालकांच्या मदतीने स्थापित करावी. तालुक्यतील संसर्गाची ठिकाणे निश्चित करून नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापना व व्यक्ती यांच्या विरुद्ध कारवाई करावी.

उपाययोजना तातडीने कराव्यात

कोरोना प्रादुर्भावासंबंधी कॉन्टॅक्ट टेसिंग, लक्षणे, विलगीकरण कार्यवाही याबाबत तालुका आरोग्य अधिकारी यांनी सर्व ग्रामस्तरीय आरोग्य कर्मचारी यांना सूचना देऊन काटेकोर अंमलबजावणीसाठी प्रवृत्त करावे. कृषी उत्पन्न बाजार समित्या, कांदा टोमॅटो यांचे बाजार याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने तेथे गर्दी प्रतिबंधक उपाययोजना केल्या आहेत किंवा कसे तसेच मास्क चा वापर, शारीरिक अंतर याबाबत दक्षता घेतली जात आहे किंवा कसे याबाबत स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी बाजाराच्या दिवशी भेटी देऊन संबंधितांकडून योग्य कार्यवाही करून घ्यावी. संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी साप्ताहिक बैठक घेऊन रुग्ण कोठे वाढत आहेत व कोणत्या कारणाने वाढत आहेत याची कारणमीमांसा करावी व त्या दृष्टीने योग्य उपाययोजना तातडीने कराव्यात.


loading image
go to top