retired teacher not getting pension on time nashik news
retired teacher not getting pension on time nashik newsesakal

Retired Teacher Pension : वेळेवर पेन्शन मिळत नसल्याने सेवानिवृत्त शिक्षकांचे हाल

Nashik News : नगरपरिषदेच्या शाळेतून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना निवृत्ती वेतन वेळेत होत नसल्याने वृद्ध पेन्शनदार यांना उतार वयात कार्यालयाच्या पायऱ्या झिजवण्यासाठी नाशिक येथे पायपीट करण्याची वेळ आली आहे. (retired teacher not getting pension on time nashik news)

त्यामुळे निवृत्तिवेतन वेळेत मिळावे अशी मागणी मनमाड शहर नगरपरिषद सेवानिवृत्त शिक्षक संघातर्फे शिक्षण आयुक्त यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मनमाड नगरपरिषदेच्या शाळेतून निवृत्त झालेल्या शिक्षकांना त्यांचे निवृत्ती वेतन हे महिन्याला वेळेवर मिळत नसल्याने अनंत अडचणींना सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे. पेन्शन वेळेवर मिळत नसल्याने घर खर्च कसा भागवयचा कसा? असा प्रश्न आता या ज्येष्ठ शिक्षकांसमोर उभा राहिला आहे. पैसे नसल्याने अनेकदा दवाखान्यात जाता येत नाही.

औषधोपचार घेत येत नसल्याचे देखील काही सेवानिवृत्त शिक्षकांनी सांगितले. याबरोबरच सातव्या वेतन आयोगाचा दुसरा व तिसरा हप्ता अद्यापही दिलेला नाही. मागील वर्षात नियमित सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना उपदान व अंशराशीकरणाच्या रकमेचे अनुदान अद्याप मिळालेले नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

retired teacher not getting pension on time nashik news
NMC News : पदोन्नतीचे निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता; कर्मचारी सेनेकडून बेकायदेशीरचा आरोप

२०१६ ते १८ या दरम्यान सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित उपदान, अंशराशीकरणाची रक्कम अद्याप मिळालेली नाही. ३ टक्के महागाई भत्ता फरकही अद्यापपावेतो मिळालेला नाही.

शिक्षण मंडळाने वेळोवेळी अंदाजपत्रकात मागणी केलेली असतानाही रक्कम मिळालेली नाही. सेवानिवृत्त शिक्षकांना विलंबाने होत असलेल्या पेन्शन व थकीत रकमांमुळे सेवानिवृत्तीचे आजारपण, दैनंदिन खर्च, औषधांचा खर्च भागविणेही जिकिरीचे झालेले आहे.

मनमाडमध्ये जवळपास २५ टक्के सेवानिवृत्त शिक्षक हे ८० ते ९० वयोगटातील आहेत. यातील अनेक जण हे काहींना काही आजाराने त्रस्त असून पेन्शन व थकीत रकमेअभावी मृत्यूशय्येवर आहेत.

त्यामुळे सदर निवृत्तिवेतन दरमहा पेन्शन ५ तारखेच्या आत करण्यात यावी अशी मागणी मनमाड शहर नगर परिषद सेवानिवृत्त शिक्षक संघाचे अध्यक्ष र.बी.दिघोळे, सरचिटणीस प्र.सु.पाटील यांनी शिक्षण आयुक्त यांना निवेदनाद्वारे केली आहे.

retired teacher not getting pension on time nashik news
Nashik News : फय्याज मुलानी नवे जिल्हा उपनिंबधक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com