Nashik News : नेहरू चौक रस्त्यावर अनधिकृत रिक्षा स्टॅन्ड; फुटपाथचा वापर भांडे धुण्यासाठी

Nashik News : नेहरू चौक रस्त्यावर अनधिकृत रिक्षा स्टॅन्ड; फुटपाथचा वापर भांडे धुण्यासाठी
esakal

Nashik News : स्मार्टसिटी कंपनीकडून गावठाण पुनर्विकास योजनेंतर्गत सिमेंट काँक्रिटचे रस्ते व त्यावर फुटपाथ तयार केले. परंतु रस्ते वापरण्याच्या मुळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. (rickshaw drivers took over roads in Nehru Chowk and set up an unauthorized rickshaw stand nashik news)

नेहरू उद्यान येथे खाद्यपदार्थांच्या गाड्या लागतात व फुटपाथचा वापर भांडे धुण्यासाठी होतो. नेहरू चौकातील रस्ते रिक्षाचालकांनी ताब्यात घेत तेथे अनधिकृत रिक्षा स्टॅन्ड उभारला आहे.

नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असल्याचे दिसत आहे. परंतु त्या विकासकामांचा खरोखरच उपयोग होतो काय, हे पाहणेदेखील सध्या महत्त्वाचे ठरत आहे. अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका या दरम्यान जवळपास २२ कोटी रुपये खर्च करून स्मार्ट रस्ता तयार करण्यात आला.

स्मार्ट रस्ता तयार करण्यामागे वाहतूक सुरळीत होण्याबरोबरच परिसर स्वच्छ दिसणे, हा उद्देश होता. मात्र नाशिककरांचे कररूपी पैसे पाण्यात गेल्याचे येथील रस्त्याच्या पाहणीवरून दिसून येते. स्मार्टसिटीअंतर्गत तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची अवस्थादेखील याचप्रमाणे झाली आहे. नेहरू उद्यान येथे मोठ्या प्रमाणात सिमेंट काँक्रिटचे फुटपाथ बनविण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nashik News : नेहरू चौक रस्त्यावर अनधिकृत रिक्षा स्टॅन्ड; फुटपाथचा वापर भांडे धुण्यासाठी
Nashik News : खोदकामामुळे विजेची उपकरणे नादुरुस्त; वीजपुरवठा बाधित

परंतु फुटपाथवर खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी ताबा घेतला आहे. अनेकदा अतिक्रमण मोहीम राबवूनही खाद्यपदार्थ विक्रेते हटत नाही. स्थानिक नगरसेवकांचे पाठबळ व अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांचे विक्रेत्यांशी असलेले लागेबांधे या गोष्टी त्याला कारणीभूत आहे. खाद्यपदार्थांची दुकाने बंद झाल्यानंतर फुटपाथवरच भांडे धुण्याचे कार्यक्रम राजरोस होतात.

खरकटे तेथेच टाकले जात असल्याने येथे मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. फुटपाथच्या बाजूलाच सांगली बँक सिग्नलपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वाहने लागतात. फुटपाथवर रिक्षा चढवून त्यात मद्यपानाचे कार्यक्रम चालतात. अशीच परिस्थिती नेहरू चौकात बांधलेल्या स्मार्ट रस्त्याची झाली आहे.

पावसाचे पाणी साठू नये म्हणून नेहरू चौकात दोन्ही बाजूला रॅम्प तयार करण्यात आले. रॅम्पवर खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे, तर मधोमध वाहनांसाठी रस्ता तयार करण्यात आला. परंतु रस्त्याचा ताबा रिक्षाचालकांनी घेतला असून, रस्त्यात उभ्या असलेल्या रिक्षांमुळे सकाळ व संध्याकाळ या भागात वाहतूक ठप्प होते. शहरात तयार करण्यात आलेले रस्ते फक्त चकाचक दिसतात. परंतु, ज्या उद्देशाने रस्ते तयार केले तो उद्देश मात्र साध्य होताना दिसत नाही.

Nashik News : नेहरू चौक रस्त्यावर अनधिकृत रिक्षा स्टॅन्ड; फुटपाथचा वापर भांडे धुण्यासाठी
Nashik Police : पोलिसांनी घेतला 80 टक्के बेपत्तांचा शोध; विविध शाखांची कामगिरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com