Covid Cases Rise : कोरोना अहवाल मागितल्याने महापालिका वैद्यकीय यंत्रणा ॲलर्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

civil hospital latest marathi news

Covid Cases Rise : कोरोना अहवाल मागितल्याने महापालिका वैद्यकीय यंत्रणा ॲलर्ट

नाशिक : मुंबई, पुणे, ठाणे, वाशीम व उस्मानाबाद जिल्ह्यात मागील दोन आठवड्यात जवळपास १९८ कोरोना रुग्ण आढळल्याने राज्य शासनाची आरोग्य यंत्रणा ॲलर्ट झाली असून,

त्याअनुषंगाने नाशिक महापालिकेलादेखील (NMC) सूचना करण्यात आल्या आहेत. (rise corona cases Municipal medical system on alert due to request for corona report nashik news)

बेड, ऑक्सिजन साठा यासंदर्भातील तत्काळ अहवाल शासनाला सादर करण्याबरोबरच कोरोना रुग्ण आढळेल त्या ठिकाणी वीस कॉन्टॅक्ट ट्रेसिंग शोधण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्य शासनाच्या आदेशामुळे महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा ॲलर्ट मोडमध्ये आली आहे.

एप्रिल २०२० मध्ये नाशिक शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण गोविंदनगर भागात आढळून आला होता. टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहराला कोरोनाने घेरले. बजरंगवाडी, जुने नाशिक असे करत सिडको या दाट लोकवस्तीच्या भागात कोरोनाने प्रवेश केला. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक भयानक ठरली दुसऱ्या लाटेने ऑक्सिजनची गरज निर्माण केली.

रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याने रुग्णालय प्रशासनदेखील हतबल झाले. दुसऱ्या लाटेने सर्वाधिक बळी घेतले. तिसरी लाट सौम्य ठरली. कोरोनामुळे आरोग्य सेवा विस्कळित झाली. त्याचबरोबर नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले. चौथ्या लाटेचा प्रभाव दिसला नाही.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

कोरोना आहे की नाही, अशी परिस्थिती असताना मुंबई, पुणे, ठाणे, वाशीम व उस्मानाबाद या शहरांमध्ये कोरोना रुग्ण वाढू लागल्याची नोंद राज्य शासनाकडे झाली आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेलादेखील सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पुणे भागात ३५ टक्के, मुंबईत २४ टक्के, तर ठाणे शहर व परिसरात १३ टक्के कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्याअनुषंगाने आययसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वीस कॉन्टॅक्ट ट्रेसिंग शोधावे, रुग्णालयांमध्ये कोरोना बेड सज्ज ठेवावे,

ऑक्सिजन साठा तपासावा, आदी प्रकारच्या सूचना देताना तयारी संदर्भातील अहवाल सादर करण्याच्या सूचना शासनाच्या आरोग्य सेवा विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी दिल्या आहेत.

"महापालिका हद्दीत कोरोनाचा अद्याप एकही रुग्ण नाही. परंतु शासन सूचनेनुसार महापालिका कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी." - डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधिकारी, महापालिका.

अशी आहे महापालिकेची व्यवस्था
- एकूण खाटा- १२, ६९४
- जनरल खाटा- ४,३१८
- ऑक्सिजन खाटा- ७,१२८
- आयसीयू खाटा- ६४६
- व्हेंटिलेटर खाटा- ६०४

कोरोना स्थिती (डिसेंबर २०२२ आकडेवारी)
- शहरात बाधित रुग्ण- २, ७६,०४२
- एकूण मृत्यू- ४,१०९ (१.५१ टक्के)
- आरटी- पीसीआरसह अन्य चाचण्या- २०,३७,५७३