गृहिणींचे बजेट कोलमडणार; पालेभाज्यांसह फळभाज्यांचे दर तेजीत

उन्हाची वाढती तीव्रता त्यातच पाण्याची टंचाईमुळे दिंडोरी रस्त्यावरील नाशिक बाजार समितीतील पालेभाज्यांसह फळभाज्यांची आवक मंदावली
गृहिणींचे बजेट कोलमडणार; पालेभाज्यांसह फळभाज्यांचे दर तेजीत

पंचवटी : उन्हाची वाढती तीव्रता त्यातच पाण्याची टंचाईमुळे दिंडोरी रस्त्यावरील नाशिक बाजार समितीतील पालेभाज्यांसह फळभाज्यांची आवक मंदावली आहे. त्यामुळे सर्वच प्रकारच्या भाज्यांच्या दरांत मोठी वाढ झाल्याने पुढील काळात गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. किरकोळ बाजारात एका लिंबासाठी दहा रुपये मोजावे लागत आहेत.

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जाणवणाऱ्या आल्हाददायक थंडीची जागा पारा चाळीशीकडे सरकल्याने अंगातील घामाच्या धारांनी घेतली आहे. त्यातच ग्रामीण भागात आतापासूनच पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागल्याने फळभाज्या, वेलवर्गीय भाज्यांच्या आवकेत मोठी घट झाली आहे, तर मेथी, कोथिंबीर, लिंबाला सोन्याचा भाव आला आहे. आवक मंदावल्याने बुधवारच्या आठवडे बाजारातही सर्वच भाजीपाल्याचे दर तेजीत राहण्याची शक्यता असल्याने पुढील आठवड्यापासून महिलांचे बजेट कोसळण्याची शक्यता आहे. भाजीपाल्याच्या वाढत्या दराने अनेक महिलांनी आतापासूनच कडधान्यांना पसंती देणे सुरू केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com