
Nashik News: उड्डाणपुलावरील दुचाकी सवारीला लागेना Break! अपघातांचा धोका अन् वाहतूक शाखेचा काणाडोळा
पंचवटी (जि. नाशिक) : शहरातील उड्डाणपुलावर दुचाकीस्वारांना बंदी असतानाही अनेक दुचाकीस्वार निर्धास्त या पुलावरून मार्गक्रमण करीत असल्याचे समोर आले आहे.
मात्र, तरीही याकडे वाहतूक शाखा काणाडोळा करीत असल्याने दुचाकीस्वारांची सवारी सुरूच असून, अपघातांचा धोका कायम असल्याचे चित्र आहे. यावर कारवाई करणार कोण, असा प्रश्नदेखील सामाजिक संस्था व कार्यकर्ते यांनी उपस्थित केला आहे. (risk of accidents at flyover due bike ride ignorance of traffic department Nashik News)
२०१३ मध्ये नाशिक शहरात उड्डाणपूल लोकार्पण सोहळा पार पडला. त्याच दिवशी उड्डाणपुलावरून स्टंटबाजी करत दुचाकी चालविणाऱ्या तीन तरुणांचा अपघात झाल्याची घटना घडली होती. आता अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
शहर पूर्ववत होत आहे. नाशिक शहरातून जाणाऱ्या या उड्डाणपुलावरून मुंबई- आग्रा महामार्गावर अनेक महाविद्यालयात आहेत. यात शिक्षण घेण्यासाठी दररोज हजारो विद्यार्थी येतात.
शॉर्टकट म्हणून बरीचशी विद्यार्थी पुलावरून सुसाट वेगाने दुचाकी हाकत आपले महाविद्यालय गाठतात. या दरम्यान अनेकदा अपघात विद्यार्थ्यांना प्राणदेखील गमवावे लागतात. तसेच, मुंबई- आग्रा महामार्गाहून मार्गक्रमण करत परगावी जाणारे दुचाकीस्वारदेखील जात असतात.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

यासाठी २०१३ मध्ये घडलेल्या अपघाताच्या घटनेनंतर नाशिक पोलिस आयुक्तालयाकडून उड्डाणपुलावर दुचाकी वाहनांना बंदी घातली होती. बंदी घातल्यानंतरही काही दिवस याठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूकदेखील करण्यात आली होती.
मात्र, काही दिवस उलटल्यानंतर येथील वाहतूक शाखेचे कर्मचारी गायब झाले. याचा फायदा पुन्हा दुचाकीधारकांनी घेत उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू केली आहे. यामुळे पुन्हा या उड्डाणपुलावर अपघाताची शक्यता वाढली आहे.