
Nashik Crime News : आंबे व्यापाऱ्याला अडवून जबरी रस्ता लूट; मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावरील घटना
Nashik Crime News : मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावर दहिवाळ शिवारात आंबे व्यापाऱ्याला रस्त्यात अडवून मारहाण करीत जबरी रस्ता लूट करण्याचा प्रकार घडला.
चौघा दरोडेखोरांनी आंबे व्यापाऱ्याकडील रोख तीन लाख रुपये जबरदस्तीने लुटून नेले. (robbers forcefully robbed 3 lakh rupees from mango merchant nashik crime news)
शुक्रवारी (ता.२६) मध्यरात्री हा प्रकार घडला. मोबीन नाजिम शहा (वय ३५, रा. मिर्झा कॉलनी सिल्लोड, जि. छ. संभाजीनगर) हे वाजदा (गुजरात) येथे आंबे खरेदी करण्यासाठी जात असताना २० ते २५ वयोगटातील चौघा संशयितांनी त्यांना कळवाडी ते दहिवाळच्या मध्यावर निर्जन ठिकाणी रस्त्यात अडवून मारहाण केली.
यानंतर त्यांच्या गाडीत ठेवलेली रोख ३ लाख रुपयांची बॅग बळजबरीने हिसकावून नेली. मोबीन शहा यांना ही रक्कम फारुख शेख, आवेश शेख व रहीम शेख यांच्याकडून मिळाली होती. मारहाणीत मोबीन शहा किरकोळ जखमी झाले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
रस्तालुटीची घटना कळताच अपर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती, उपअधिक्षक पुष्कराज सूर्यवंशी, तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक स्वप्नील कोळी यांनी मध्यरात्री घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
यानंतर चाळीसगाव फाटा व परिसरात नाकाबंदी करण्यात आली. मात्र रस्ता लूट करणाऱ्या दरोडेखोरांचा सुगावा लागला नाही. श्री. शहा यांच्या तक्रारीवरून तालुका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.