Gram Panchayat Bypoll Election : श्रीरामपूर ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धक्का

Villagers felicitating women candidates who won in Gram Panchayat by-elections.
Villagers felicitating women candidates who won in Gram Panchayat by-elections.esakal

Nashik News : देवळा तालुक्यातील लक्षवेधी ठरणाऱ्या श्रीरामपूर ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा धक्कादायक निकाल लागला असून सत्ताधाऱ्यांना धक्का देत सर्वसामान्य कुटुंबातील दोघे उमेदवार विजयी झाले आहे.

प्रतिष्ठेच्या या पोटनिवडणुकीत प्रस्थापितांची सत्ता कायम राहणार का? सत्तेत परिवर्तन होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. (Rulings shocked in Srirampur Gram Panchayat bypoll election nashik news)

श्रीरामपूर ग्रामपंचायतीच्या मागील वर्षी डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत थेट सरपंच पदांचे उमेदवार हे वॉर्ड तीनमधून सदस्य पदासाठी बिनविरोध निवडून आले होते. तर याच वॉर्ड क्रमांक तीनमध्ये अनुसूचित जमातीच्या एका जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने जागा रिक्त होती.

येथील वॉर्ड क्रमांक तीन साठी दोन अनुसूचित जमाती महिला राखीव जागांसाठी १८ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली दोन जागेसाठी तीन उमेदवार रिंगणात उभे होते. १९ मे रोजी मतमोजणी झाली. यात विरोधी गटाच्या अर्चना रवींद्र पवार (२४५), संगीता साहेबराव पवार (२२४) मताने उमेदवार विजयी झाले आहेत.

पोटनिवडणुकीत चुरशीच्या लढतीत नाट्यमय घडामोडी घडल्या असून मतदानाच्या दिवशी गावातील संतप्त महिला वर्गाने सत्ताधाऱ्यांच्या विरोधात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा नेत आक्रमक पवित्रा घेतला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Villagers felicitating women candidates who won in Gram Panchayat by-elections.
Dr. Bharati Pawar : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांचा बैठकीतूनच जिल्हाधिकाऱ्यांना फोन!

पंचायत समितीचे अधिकारी राजेश देशमुख तसेच नायब तहसीलदार विजय बनसोडे यांनी महिला वर्गाशी समन्वय साधत निवारण केले व मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली होती. पोटनिवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात हरीश निकम या कार्यकर्त्याने दंड थोपटल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.

चार ते पाच महिन्याच्या कालावधीत सत्ताधाऱ्यांच्या कामकाजावर जनतेने प्रश्न उपस्थित केले होते. यामुळे सत्ताधाऱ्यांवर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे.

Villagers felicitating women candidates who won in Gram Panchayat by-elections.
Summer Business : उन्हाच्या चटक्याने लोखंडी कुलर वाढली मागणी; दरात 20 टक्के वाढ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com