सचिन जोशी यांना टॅली सोल्युशनचा 'चॅम्पियन ऑफ कॉज'चा पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Award

सचिन जोशी यांना टॅली सोल्युशनचा 'चॅम्पियन ऑफ कॉज'चा पुरस्कार

नाशिक : शिक्षणक्षेत्रात शून्यातून सुरुवात करून आज इस्पॅलिअर स्कूलला जागतिक स्तरावर नेलेले सामाजिक उद्योजक नाशिकचे शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांना या वर्षीचा 'चॅम्पियन ऑफ कॉज' अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे.

 टॅली सोल्युशन ही एक अग्रगण्य आंतरराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनी असून दरवर्षी आंतरराष्ट्रीय एम.एस.एम.ई. दिनाच्या निमित्ताने कंपनीतर्फे 'टॅली एमएसएमई ऑनर्स' पुरस्कार जाहीर केले जातात. 'चॅम्पियन ऑफ कॉज' हा सन्मान अशा व्यक्तीला दिला जातो ज्याचा व्यवसायाचा उद्देश जागतिक कल्याण हा असतो.

हेही वाचा: भावी मुख्याध्यापकांची होणार अग्निपरीक्षा

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमधून एम.एस.एम.ई. ऑनर पुरस्कार जाहीर होत असतो. राष्ट्राच्या आर्थिक प्रगतीत योगदान देणाऱ्या उद्योजकांना हा पुरस्कार जाहीर होत असतो. व्यवसायाच्या माध्यमातून सर्व स्तरांवर सकारात्मक प्रभाव पाडणारे उद्योजक, निर्माते, आणि नवीन व्यावसायिक यांना प्रेरणा मिळावी म्हणून टॅली सोल्युशन हा पुरस्कार दर वर्षी आंतरराष्ट्रीय एम.एस.एम.ई. या दिवशी जाहीर करत असत. २७ जून हा हा जगातील सूक्ष्म, लघु आणि माध्यम उद्योग करणाऱ्या उद्योजकांचा दिवस म्हणून साजरा होतो.

भारताच्या सामाजिक, आर्थिक वाढीच्या कथेच्या गाभ्यामध्ये ६.३ कोटी एम.एस.एम.ई. आहेत जे भारतामध्ये विविध ठिकाणी नेतृत्व करून देशाला प्रगतीकडे नेत आहेत. या एम.एस.एम.ई.मधले हिरो शोधून त्यांचा गौरव करण्यासाठी टॅली सोल्युशन या जागतिक कंपनीकडून भारत, संयुक्त अरब, सौदी अरेबिया, बांग्लादेश, नेपाळ, केनिया आणि इंडोनेशिया या देशांतून ५ श्रेणींमधून हा अवॉर्ड देण्यात येतो. ज्यामध्ये वंडर वुमन, बिझनेस मेस्टो, डिजिटल ट्रान्सफॉर्मर, नेक्स्ट जनरेशन आयकॉन आणि सर्वांत महत्त्वाचा 'चॅम्पियन ऑफ कॉज' हा अवॉर्ड आहे.

सचिन उषा विलास जोशी यांना या वर्षीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांनी शिक्षणामध्ये त्यांनी विविध उपक्रम राबवून शिक्षण आनंददायी आणि दर्जेदार केलं. सचिन जोशी यांनी संस्थेच्या चेअरमन डॉ. प्राजक्ता जोशी यांनी हा सन्मान मुंबई इथल्या सहारा हॉटेलमध्ये केंद्र शासन एम.एस.एम.ई चे संचालक श्री. पी एम पार्लेवार आणि असोसिएशन ऑफ मुंबई इंडस्ट्रीचे चेअरमन नेव्हील सांगवी यांच्या हस्ते स्वीकारला.

हेही वाचा: केंद्रीय गृहमंत्रालयात अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याच्या नियमांत बदल

यावेळी सचिन जोशी म्हणाले व्यवसाय व्यवस्थापन आणि एम.एस.एम.ई. क्षेत्रात हा अतिशय प्रतिष्ठेचा सन्मान असून त्याने इस्पॅलिअर स्कूलला अजून ऊर्जा मिळाली असून यापुढे विद्यार्थ्यांमध्ये डिजाइन थिंकिंगवर जास्त काम करण्यास आम्हाला प्रेरणा मिळेल. भारतासाठी विविध क्षेत्रात जागतिक नेतृत्व करतील असे विद्यार्थी बनवणे हे आमचे ध्येय असेल.

Web Title: Sachin Joshi Awarded Tally Solutions Champion Of Cause Award Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashikeducationaward