SAKAL IMPACT : NICTE चे कार्यालय दिल्लीत हलवू नये; भुजबळ यांची सभागृहात मुख्यमंत्र्यांकडे मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chhagan bhujbal

SAKAL IMPACT : NICTE चे कार्यालय दिल्लीत हलवू नये; भुजबळ यांची सभागृहात मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नाशिक : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) यांचे मुंबईतील पश्चिम विभागीय कार्यालय दिल्लीत स्थलांतरित करण्यात येत आहे. या संदर्भात ‘सकाळ’ मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.

या बातमीची दखल घेताना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सभागृहात हा प्रश्‍न उचलला आहे. मुंबईतील कार्यालय दिल्‍लीत हलवू नये, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍याकडे केलेली आहे. (SAKAL IMPACT Chhagan Bhujbal demand to Chief Minister shinde in vidhansabha NICTE office should not be shifted to Delhi nashik news)

कार्यालयाच्या स्थलांतरामुळे शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे एआयसीटीईचे कार्यालय स्थलांतर करण्यात येऊ नये, तो निर्णय थांबवावा, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून शुक्रवारी (ता.३) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सभागृहात केली.

छगन भुजबळ यांनी शुक्रवारी सभागृहात एआयसीटीईच्या कार्यालयाच्या स्थलांतराबाबत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, एआयसीटीईचे कार्यालय स्थलांतरित करण्याच्या निर्णयामुळे शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना आहे.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

विविध तंत्रशिक्षण शिक्षणक्रम, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम एआयसीटीई अंतर्गत येत असतात. अशावेळी प्रवेश क्षमतेपासून अन्य परवानग्यांशी निगडित बाबी या विभागांतर्गत येतात. विभागीय कार्यालय स्थलांतरित करण्यात आल्‍यास विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होणार असून त्यांच्यात नाराजी पसरली आहे.

त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याकडे विशेष लक्ष देऊन हा निर्णय मागे घेऊन कार्यालयाचे स्थलांतर थांबविण्यात यावे, अशी मागणी छगन भुजबळ यांनी यावेळी सभागृहात केली.

टॅग्स :Nashiksakal impact news