SAKAL IMPACT : दिव्यांग प्रमाणपत्र वितरणास सुरवात; फरपट थांबल्याने समाधान : ‘सकाळ’ मानले आभार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. Resident Medical Officer Dr. Member of District Medical Patient Committee Zubair Hashmi and colleagues felicitating Nitin Rawate.

SAKAL IMPACT : दिव्यांग प्रमाणपत्र वितरणास सुरवात; फरपट थांबल्याने समाधान : ‘सकाळ’ मानले आभार

जुने नाशिक : डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्र वितरणास अखेर मंगळवारी (ता. २१) सुरवात झाली. पाहिल्याच दिवशी २ दिव्यांगांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. दिव्यागांची होणारी फरपट थांबणार असल्याने त्यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात आले. (SAKAL IMPACT Commencement of Disability Certificate Distribution nashik news)

दिव्यांगांसाठी डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय येथे तर जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी जिल्हा रुग्णालय येथे विशेष केंद्र कार्यान्वित केले होते. २०१९ मध्ये कोरोना प्रादुर्भावामुळे डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील केंद्र बंद केले होते.

परिस्थिती सामान्य झाल्यानंतर बिटको रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र वितरण केंद्र स्थलांतरित केले होते. शहरातील दिव्यांगांना प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी बिटको रुग्णालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते.

त्या ठिकाणीही वारंवार हेलपाटे मारावे लागत होते. आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत होता. याबाबतचे वृत्त काही दिवसांपूर्वी ‘सकाळ’ प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची दखल घेत महापालिका वैद्यकीय विभागाकडून डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात पुन्हा केंद्र सुरू करण्यासाठीचे नियोजन काही दिवसात पूर्ण केले.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

त्यानंतर मंगळवारपासून पुन्हा डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात केंद्र सुरू करण्यात आले. केंद्र सुरू झाल्याने दिव्यांगांनी समाधान व्यक्त केले. जिल्हा वैद्यकीय रुग्णालय समितीचे सदस्य झुबेर हाश्मी यांच्यासह श्री. सत्तार, वसीम पठाण यांच्याकडून वैद्यकीय अधीक्षक बापूसाहेब नागरगोजे आणि रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन रावते यांचे आभार व्यक्त करत त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. हिरे, डॉ. स्नेहल बागडे, मेट्रन श्रीमती वैशंपायन तसेच कर्मचारी उपस्थित होते.

"डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्र वितरण केंद्र बंद असल्याचे वृत्त ‘सकाळ’ मध्ये प्रसिद्ध केले. केंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. तसेच महापालिका वैद्यकीय विभागाकडून तत्परता दाखवत योग्य प्रकारचे नियोजन करून पुन्हा केंद्र सुरू केल्याने धन्यवाद."- झुबेर हाश्मी, सदस्य, रुग्णालय समिती