SAKAL IMPACT : अखेर शवगाराकरीता 80 लाखांचा निधी मंजूर! पालकमंत्री भुसेंकडून पाठपुरावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dada Bhuse news

SAKAL IMPACT : अखेर शवगाराकरीता 80 लाखांचा निधी मंजूर! पालकमंत्री भुसेंकडून पाठपुरावा

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयाला गेल्‍या २४ नोव्हेंबरला पालकमंत्री दादा भुसे यांनी अचानक भेट देत पाहणी केली होती. या दरम्‍यान शवागारातील दुरवस्थेचे भयावह चित्र समोर आले होते. (SAKAL IMPACT Fund of 80 lakhs finally approved for mortuary Follow up from Guardian Minister Bhuse nashik news)

कोल्डरूमच्या शीतयंत्रणेसाठी शासनाकडे पाठवलेल्या प्रस्तावाचे तातडीने पाठपुरावा करण्याचे आदेश पालकमंत्री भुसेंनी दिले होते. त्यानुसार तीन महिन्यातच शवागारातील शीत शवपेट्यासाठी ऐंशी लाखांचा निधी खर्चाला प्रशासकीय मान्‍यता देण्यात आलेली आहे. यामुळे शवपेट्यांची क्षमता ४८ ने वाढण्यास मदत होणार आहे

कोरोना महामारीपूर्वीपासून सुमारे अडीच वर्षांच्‍या कालावधीपर्यंत शवागारातील शीतयंत्रणा बंद असल्‍याचे पाहाणीदरम्‍यान निदर्शनात आले होते. शवागारातील शीत शवपेट्यांच्या दुरवस्थेमुळे, त्याचा फारसा फायदा होत नव्‍हता.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

त्यामुळे जिल्हा रुग्णालयाकडून एकूण ५० शीतशवपेट्यांची मागणी केली होती. मात्र हा प्रस्ताव गेल्या तीन वर्ष लालफितीत अडकलेला होता. गेल्या दोन महिन्यांपासून मृतदेह कुजत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरल्‍याचेही या पाहणीत लक्षात आले होते.

किमान साठ मृतदेहांची व्यवस्था होईल, अशी यंत्रणा उभारण्याच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्याचे निर्देशही भुसे यांनी दिले होते. जिल्‍हा नियोजन समितीच्‍या बैठकीत या विषयाला प्राधान्‍य देण्यात आले. या बैठकीस ऐंशी लाखांच्‍या निधीला प्रशासकीय मान्‍यता दिलेली आहे.