SAKAL IMPACT : चिमुकल्या समर्थला अनेकांचा मदतीचा हात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Samartha is making the sound 'Usal ghya Usal' from the Bhonga and in second photo Samarth (right) with father Ishwar, mother Anita, grandmother Pushpabai and younger brother Swami.

SAKAL IMPACT : चिमुकल्या समर्थला अनेकांचा मदतीचा हात

इंदिरानगर (जि. नाशिक) : पाथर्डी फाटा भागात राहणाऱ्या आणि आठवीत शिकणाऱ्या अवघ्या 13 वर्षाच्या समर्थ ईश्वर जाधव या बालकाची मटकी ची उसळ विकून 'चिमुकल्या समर्थ च्या खांद्यावर कुटुंबाचे ओझे'या बातमी द्वारे आज च्या 'सकाळ' मध्ये जगण्याचा संघर्ष प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक सहृदयी नागरिकांनी त्याच्या जगण्याच्या लढाई ला मदती चा हात दिला आहे. (SAKAL IMPACT Little Samarth gets helping hand from many people from society nashik news)

दररोज सकाळी तीन तास आणि सायंकाळी तीन तास सायकल द्वारे पंधरा-सोळा किलोमीटर फिरून उसळ विक्रीतून दिवसासाठी दीडशे दोनशे रुपये कमवून कुटुंबाचा गाडा तो ओढत आहे .वडील मधुमेह आणि संधिवाताने काही करू शकत नाहीत.

तर आई देखील मूक बधीर असल्याने त्यांना देखील कुणी काम देत नाही. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचा भार तो वाहत आहे. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर मालेगाव येथील प्रसिद्ध दादा पाटील मंडपवाले यांनी त्याच्या वडिलांसाठी कोल्हापूर येथील एका संस्थेतून मधुमेह आणि संधिवातावर मिळणाऱ्या औषधांची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दाखवली आहे.

इंदिरानगर येथे राहणारे आदिवासी विकास विभागाचे माजी कर्मचारी कमलाकर भामरे यांनी देखील समर्थांच्या शिक्षणासाठी भरीव मदत देण्याची तयारी दाखवली आहे. पाथर्डी फाटा येथील शिवसेने चे वसंत पाटील, पंचवटी येथील भाजपचे पदाधिकारी सुनील केदार यांनी देखील जाधव कुटुंबाची भेट घेण्याचे नक्की केले आहे.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

तर सिडको मधील साहित्यिक किरण सोनार आणि मित्रपरिवार या दोघा भावांचा शिक्षणासाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न करणार आहेत. पुणे सकाळ मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून काम करणारे संतोष शाळीग्राम यांनी या चिमुकल्याचा व्हिडिओ आणि ही संबंधित बातमी अनेकांशी शेअर केल्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांच्याशी संपर्क साधाला असून ते त्याला भेटण्यासाठी खास नाशिकला येणार आहेत अशी माहिती दिली आहे.

त्याची पायपीट कशी कमी करता येईल आणि त्याचा आहे तो व्यवसाय कसा वाढवता येईल यासाठी खासदार कोल्हे स्वतः प्रयत्न करणार आहेत . श्री शाळीग्राम यांच्या अनेक उद्योजक मित्रांनी त्याला हवी ती मदत देऊन त्याच्या कुटुंबाला आधार देण्याची तयारी दाखवली आहे. समर्थांचे वर्ग शिक्षक जयदीप पाटील आणि सहकाऱ्यांनी देखील मनापा शिक्षकांच्या सहकार्याने त्याला भरीव मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.