esakal | सिन्नर : कोरोना काळात 'या' कंपनीत घसघशीत पगारवाढ अन् बोनसही
sakal

बोलून बातमी शोधा

sinner company

सिन्नर : कोरोना काळात 'या' कंपनीत घसघशीत पगारवाढ अन् बोनसही

sakal_logo
By
अजित देसाई

सिन्नर (जि.नाशिक) : औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीतील कामगारांना कोरोना काळात चक्क घसघशीत वेतनवाढ नुकतीच करण्यात आली. ‘सीटू’ संलग्न नाशिक वर्कर्स युनियन व कंपनी व्यवस्थापन यांच्यात झालेल्या चर्चेत वेतनवाढीच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.

कोरोना काळात 'या' कंपनीत घसघशीत पगारवाढ अन् बोनसही

सिन्नर येथील औद्योगिक क्षेत्रातील रिंग प्लस ॲक्वा कंपनीतील कामगारांना सहा हजार रुपयांची घसघशीत वेतनवाढ नुकतीच करण्यात आली. या करारात सर्व कामगारांना पाच हजार ९९४ रुपयांची पगारवाढ व शासनाकडून वेळोवेळी वाढवून येणारा स्पेशल अलाउन्स (महागाई भत्ता) बोनस प्रतिवर्ष २० टक्के मिळणार आहे. तसेच मेडिक्लेम पॉलिसीसाठी दर वर्षी दोन हजार ४०० रुपयांची वाढ करण्यात आली. ३०६ रुपये प्रतिमहिना मागील कालावधीत साध्य केलेले मिळणार आहेत. तसेच दीड हजार रुपये इन्सेटिव्हसाठी देण्यात येणार आहे. १९ फेब्रुवारीची छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची सुटीही मंजूर करण्यात आली. वेतनवाढ करारानुसार पहिल्या वर्षी एकूण रकमेच्या २५ टक्के पगारात वाढ दिली जाईल. हा करार १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२३ साठी आहे. सर्व कामगारांना फरकापोटी ३१ ते ३५ हजार रुपये रक्कम मिळणार आहे.

हेही वाचा: नाशिक : गोदावरीला पूर; आपत्ती निवारण विभाग अलर्टवर

व्यवस्थापन प्रतिनिधी कमलाकर टाक व नाशिक वर्कर्स युनियनतर्फे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्यात वेतनवाढीबाबत सकारात्मक चर्चा होऊन वेतनवाढीचा करार करण्यात आला. या वेळी मुख्य व्यवस्थापकीय संचालक एम. व्ही. चंद्रशेखर, प्लांट हेड कमलाकर टाक, क्वालिटी हेड अविल त्यागी, डेव्हलपमेंट हेड अमोल शहा, एचआर हेड नानासाहेब कोळगे, नंदू थोरात, ‘सीटू’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. कराड, उपाध्यक्ष सीताराम ठोंबरे, तालुका अध्यक्ष हरिभाऊ तांबे, उपाध्यक्ष सूर्यभान थोरात, दत्तात्रय चव्हाणके, बाबासाहेब पांगारकर, सुभाष सावंत यांनी करारावर सह्या केल्या.

हेही वाचा: नाशिक : पोलिस शिपायाकडूनच अल्पवयीन मुलीचे अपहरण

loading image
go to top