नायलॉन मांजाची सर्रास विक्री! आळा घालण्यास प्रशासन उदासीन 

nylon-manza.jpg
nylon-manza.jpg

नाशिक : मकरसंक्रांतीपूर्वीच युवक आणि मुलांमध्ये पतंग उडविण्याचा उत्साहात दिसून येत आहे. बाजारातही पतंगांसह विविध प्रकारचा मांजा विक्रीस आला आहे. नायलॉन मांजा विक्रीस प्रतिबंध असला तरी त्याची जोरदार विक्री होत असून, नागरिक, पक्षी जखमी होण्याचे प्रकारही समोर येत आहेत. प्रशासन मात्र नायलॉन मांजाविक्रीस आळा घालण्यास उदासीन दिसत आहे. 

नायलॉन मांजाविक्रीस आळा घालण्यास उदासीन

जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मकरसंक्रांत असली तरी डिसेंबरपासून पतंगबाजीचा जोर दिसून येत आहे. बाजारातही पतंग आणि मांजा विक्रीची दुकान सजली आहेत. नायलॉन मांजाला सर्वाधिक मागणी आहे. त्यास बंदी असल्याने चोरी-छुप्या पद्धतीने मोठ्या प्रमाणाव नायलॉन मांजाविक्री होत आहे. दर वर्षी नायलॉन मांजा विक्री करू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून परिपत्रक काढून पोलिस आणि वन विभागास कारवाईसाठी आदेशित केले जाते. यंदा मात्र अद्याप कुठलेही आदेश निघाले नाहीत. पोलिसही कारवाईबाबत उदासीन दिसत आहे. त्यामुळे विक्रेत्यांचे चांगलेच फावले आहे. 

प्राणी, पक्षी, माणसांच्या बेततोय जिवावर 
नायलॉन मांजामुळे अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. मांजा पक्ष्यांच्या जिवावर बेतला असून, झाडांमध्ये अडकून मांजात पक्षी फसणे, त्यांच्या गळ्यास फास लागत आहे. दुचाकीचालकास मांजाचा फास लागून जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. गेल्या वर्षी काही नागरिकांना मांजामुळे प्राण गमवावा लागला होता. तसे प्रकार यंदा घडू नये, यासाठी प्रशासनाने नायलॉन मांजा विक्रीवर बंदी आणावी. तरीही त्याची विक्री करताना कुणी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com