Sanjay Raut | राज्याच्या मातीत गद्दारी, बेईमानीला थारा नाही : संजय राऊत

Sanjay Raut
Sanjay Raut esakal

मालेगाव : महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य आहे. या राज्याच्या मातीमध्ये गद्दारीला आणि बेईमानीला थारा नाही. मागील काही महिन्यात या मातीत तात्पुरते भांगेच पीक आले. जनता भांगेचे हे पीक उपटून फेकल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.

पालकमंत्र्यांनी मला मालेगावात येऊन दाखवा असे आवाहन दिले होते. मी दोन दिवस आधीच मालेगावात आलो आहे. कदाचित जे घडते ते चांगल्यासाठीच घडते. त्यामुळेच आपल्याला हिरे सापडले असे मत शिवसेना (Shivsena) नेते (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी येथे व्यक्त केले.

Sanjay Raut
Sanjay Raut: ‘त्या’ मुलीचा फोटो ट्वीट केल्यावरुन गदारोळ झाला पण, संजय राऊत भूमिकेवर ठाम

येथील प्रशांतदादा हिरे व्यापारी संकुलातील (रॉयल हब) शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार विनायक राऊत, उपनेते अद्वय हिरे, संपर्क प्रमुख जयंत दिंडे, जिल्हा प्रमुख गणेश धात्रक, नितीन आहेर आदी उपस्थित होते.

श्री. राऊत म्हणाले, येथील लोकप्रतिनिधींना शिवसेनेने सर्व काही दिले. त्यांना हळूच कोणीतरी खोक्याचे आमिष दाखवले अन् ते पळून केले. सध्या चोरांचा सुळसुळाट आहे. मालेगावतही चोर आहेत. येथील लोकप्रतिनिधीने गिसाका वाचविण्यासाठी कोटी रुपये जमा केले. फक्त १६ कोटी ५० लाख रुपये दाखवले. त्यामुळे चोराला चोर नाही तर काय म्हणायचे.

ही त्यांची शेवटची निवडणूक आहे. राज्याला संदेश देतानाच गद्दारांचा समाचार घेण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मालेगावला येत आहेत. कर्मवीर भाऊसाहेब हिरे व त्यांच्या कुटुंबात राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता होती. तीच क्षमता व प्रचंड ऊर्जा शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांच्यात आहे. त्यांनी राज्याकडे सुद्धा लक्ष द्यावे.

Sanjay Raut
Nashik News: नाशिक शहरात धावणार पिंक रिक्षा; या तारखेपासून नाशिककरांच्या सेवेत

खासदार विनायक राऊत, श्री. हिरे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रमोद शुक्ला यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी जिल्हा समन्वयक पवन ठाकरे, नथू जगताप, अशोक निकम, संजय निकम, विष्णू पवार, रामा मिस्तरी, प्रकाश वाघ, डॉ. उज्जैन इंगळे, सुभाष सूर्यवंशी, हिरालाल नरवडे, बळिराम देसले, शेखर पगार, आनंदसिंग ठोके, नंदलाल शिरोळे, जगन्नाथ हिरे, गणेश खैरनार, संजय हिरे, महेश पवार, विनोद बोरसे, विठोबा छरंग, प्रवीण पगार, महेंद्र देवरे, जालिंदर शेलार, जितेंद्र देसले, राजाराम जाधव, कैलास तिसगे, सचिन भडांगे, भूषण बच्छाव, भरत पाटील, गणेश पाटील, भिमेश्वर महाजन, पंकज बच्छाव, विजय गवळी, अरुणा सोनजकर, संयोग निकम, जीवन हिरे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sanjay Raut
Sanjay Raut News : रेकॉर्ड ब्रेक शब्द कमी पडेल; उध्दव ठाकरेंच्या मालेगावातील सभेपूर्वी संजय राऊतांची गर्जना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com