Sanjay Raut | नाशिकसह राज्यात 2024 ला भगवा फडकवू : संजय राऊत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

Sanjay Raut | नाशिकसह राज्यात 2024 ला भगवा फडकवू : संजय राऊत

पंचवटी (जि. नाशिक) : नाशकात ज्यावेळी शिवसेनेचे पहिले अधिवेशन झाले होते, त्यावेळी राज्यात शिवसेनेची सत्ता आली होती. २०२४ मध्ये होणाऱ्या नाशिक काय तर राज्यात भगवा फडकवू असा विश्वास खासदार तथा शिवसेना नेते (उद्धव ठाकरे गट) संजय राऊत यांनी व्यक्त केला. शिवसेनेचे उपनेते सुनील बागूल यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी ते आज (ता. १४) बोलत होते. (Sanjay Raut statement will raise saffron in state including Nashik by 2024 nashik political news)

सध्या मोदी सारखे मुंबईला चकरा मारत असून त्यांनी कितीही जोर लावला तरी मुंबईवरील भगवा कोणी उतरवू शकत नाही. अशी ग्वाही याप्रसंगी राऊतांनी दिली. पंचवटीसह नाशिक मध्ये जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी आपण घ्यावी, असे आव्हान त्यांनी शिवसैनिकांना केले.

तसेच आतापर्यंत आले किती गेले किती मात्र शिवसेनेचा दरारा कायम असून मला ११० दिवस तुरुंगात ठेवले मी सत्तेत आल्यास त्याची व्याजासहित परतफेड करील. शिवसेनेचा रंग आणखी गडद होऊ द्या.

आज नाशिकमधील एक बाई शिवसेनामधून दुसऱ्या पक्षात गेली. ती किती लाखात गेली असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. शिवसेनेतून शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी शिंदे गटाने नाशिकमध्ये एजंट सोडले आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

ते एजंट दहा-बारा लाख रुपयांमध्ये प्रवेश करण्यासाठी व्यवहार करतात. मात्र प्रत्यक्षात प्रवेश केलेल्या लोकांच्या हातात सव्वा लाखच पोहोचवतात. गद्दारांना जनता माफ करणार नाही. राजकारणात जेव्हा काही नवीन व मोठे घडतं ते नाशिकमधूनच घडते.

एवढे पावित्र्य नाशिकच्या भूमीत असल्याचेही त्यांनी नमूद केले. या प्रसंगी आमदार दिलीप बनकर, सुनील बागूल, शुभांगी पाटील, दत्ता गायकवाड, विजय करंजकर, वसंत गीते, विनायक पांडे यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुनील बागूल यांचे कौतुक

खासदार संजय राऊत म्हणाले की, सुनील बागूल यांना शुभेच्छा देण्यासाठी नाशिकला आलो आहे. सुनील बागूल आपण अजातशत्रू आहात. शिवसेनेचा नेता असेल तर गर्दी कमी पडत नाही. नाशिकच्या शिवसेनेवर बागुलांची छाप आहे.