
Nashik News : स्कॉर्पिओ गाडीने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी नाही
पंचवटी (जि. नाशिक) : चोपडा लॉन्समार्गे मखमलाबाद रोड कडे जाणाऱ्या मार्गावरील धनदाई लॉन्स समोर एका स्कार्पिओने पेट घेतल्याची घटना घडली आहे.यात सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही आहे.
आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश मिळाले आहे. मात्र, स्कार्पिओ संपूर्ण जळून खाक झाली आहे. (Scorpio car suddenly caught fire Fortunately no casualties Nashik News)
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवार (ता.१५) रोजी दरम्यान स्कार्पिओ क्रमांक एम एच १५ डी एस ६०५५ ही गंगापूर नाक्या कडून मखमलाबाद रोड कडे चालली होती. सुमारे रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान हनुमान वाडी लिंक रोडवरील धनदाई लॉन्स समोर स्कार्पिओतून अचानक धूर निघू लागल्याने वाहनचालक प्रतिक संतोष कमानकर (वय २५, रा. गुरुजन सोसायटी, स्नेह नगर , म्हसरूळ) याने लागलीच गाडी रस्त्याच्या कडेला लावत सर्वजण गाडीतून उतरले.
याच रस्त्याने जाणाऱ्या एका सुजाण नागरिकाने लागलीच अग्नीशामक दल व पोलिसाना कळविले. यावेळी लागलीच अग्निशामक बंब घटनास्थळी पोहचले. आग विझविण्ासाठी एक बंब पाणी व दोन बॅरल फोम लागले.यावेळी अग्नीशामक दलाचे वाहन चालक पी पी मोहिते फायरमन एन पी म्हस्के, एस एच माळी, एम एस पिंपळे आदी केले आग आटोक्यात आणली.