Nashik Accident News: भरधाव स्कॉर्पिओ नाल्यात कोसळली; जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार | Scorpio crashes into drain injured treated at private hospital Nashik Accident News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

A car lying in a drain after an accident

Nashik Accident News: भरधाव स्कॉर्पिओ नाल्यात कोसळली; जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार

Nashik Accident News : भरधाव वेगाने आलेल्या स्कॉर्पिओ चालकाचा वाहनाचा ताबा सुटल्याने वाहन थेट नाल्यात कोसळले. यात चालक गंभीर जखमी झाला असून इतर चार जणांना किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी असल्याने पुढील अनर्थ टळला.

अपघातात जखमी झालेले तीन विद्यार्थी हे एका नामांकित महाविद्यालयाचे असल्याचे समजते. या अपघातात चारचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. (Scorpio crashes into drain injured treated at private hospital Nashik Accident News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याबाबत अधिक माहिती अशी, स्कॉर्पिओ वाहनाचे चालक निशांत श्रीवास्तव (वय २५ रा. संजीवनगर अंबड) हे आपल्या स्कॉर्पिओने (एमएच १५, ईबी ६९५०) मंगळवारी (ता. २३) पहाटे पाचच्या सुमारास माऊली लॉन्स परिसरातून जात असताना रस्त्यावरील वळण लक्षात न आल्याने त्यांचा चार चाकी वाहनाचा ताबा सुटला. वाहन थेट नाल्यात कोसळले.

यात चालक निशांत श्रीवास्तव गंभीर झाला. वाहनात बसलेले इतर चार प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी नाल्यात कोसळलेल्या स्कॉर्पिओ वाहनाला क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाली होती. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Nashikaccident case