esakal | पोटासाठी हो.. स्मशानातील राखेतून उदरनिर्वाहाचा शोध; विदारक चित्र
sakal

बोलून बातमी शोधा

cemetery

पोटासाठी हो.. स्मशानातील राखेतून उदरनिर्वाहाचा शोध; विदारक चित्र

sakal_logo
By
दत्ता जाधव

पंचवटी (नाशिक) : कोरोनाच्या साथीमुळे अनेकांना आपले आप्तस्वकीय, जीवलग यांना गमावण्याची वेळ आली आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी काही महिला चक्क स्मशानातच उदरनिर्वाहाचा शोध घेत आहेत, या अपेक्षेने त्यांचे जीव धोक्यात असल्याचे विदारक दृश्‍य दिसत आहे.

स्मशानभूमीतील राखेतून ‘अर्थ’ शोधण्याचा त्यांचा प्रयत्न

वाढत्या कोरोना संसर्गाने शहरासह जिल्हाभरातील मृत्युदरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील मुख्य स्मशानभूमीसह पंचवटी व उपनगरांतील अन्य स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास जागा अपुरी पडत असल्याने चक्क जमिनीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ नातेवाइकांवर आली आहे. त्याचवेळी दुसरीकडे पोटाची खळगी भरण्यासाठी काही महिला चक्क स्मशानातील राखेतून काहीतरी मिळते का, याअपेक्षेने जीव धोक्यात घालून शोध घेत असल्याचे विदारक दृश्‍य दिसत आहे.

हेही वाचा: असे घडले मृत्यूतांडव! नाशिक ऑक्सिजन गळतीची घटना cctv मध्ये कैद; पाहा VIDEO

आशेने दिवसभर महिला बसतात

कोरोनाच्या साथीमुळे अनेकांना आपले आप्तस्वकीय, जीवलग यांना गमावण्याची वेळ आली आहे. मृत्यूच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याने अनेक मृतदेहांवर चक्क जमिनीवर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. रोज २०- २५ मृतदेह येत असल्याने स्मशानभूमीतील राख बाजूला करण्यासही कोणाला वेळ नाही, याच राखेतून काहीतरी मिळेल, या आशेवर या महिला ही राख गोळा करून त्यातून काहीतरी मिळेल, या आशेने दिवसभर बसलेल्या असतात.

हेही वाचा: नाशिक ऑक्सिजन गळती : संशय बळावला! ऑक्सिजन ठेकेदार कंपनीचा लागेना थांगपत्ता

नाव छापू नका

काही दिवसांपासून अशा महिलांचा वावर स्मशानभूमीत वाढला आहे. कुतुहलाने त्यांना त्याबाबत विचारले असता, कृपया नाव छापू नका, पोटाची खळगी भरण्यासाठी सध्या कामधंदाच नसल्याने याठिकाणी दोन पैसे मिळतील, याआशेवर दिवसरात्र शोध सुरूच असल्याचे दिसून आले. यातून प्रत्येकाला काहीतरी मिळतेच असे नाही. तीन दिवसांपासून काहीच हाती लागत नसल्याची खंत त्यातील एका महिलेने दिली. एकूणच कोरोनामुळे माणसाचे जगणे किती व कसे अवघड बनले आहे, हेच या घटनेवरून दिसून येते.

loading image