esakal | इगतपुरीत मान्सून पर्यटनाला जाताय? वाचा महत्वाची बातमी
sakal

बोलून बातमी शोधा

igatpuri

इगतपुरीत पर्यटनाला जाताय? वाचा महत्वाची बातमी

sakal_logo
By
पोपट गवांदे

इगतपुरी (जि.नाशिक) : कोरोनाची दुसरी लाट नुकतीच ओसरली आहे. यानंतर राज्य सरकारने काही निर्बंध शिथिल केले. मात्र याचा फायदा घेत पर्यटक पर्यटनस्थळांवर प्रचंड गर्दी करत आहे. पर्यटक सोशल डिस्टेंसिंगचे पालन करत नाहीत. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्कही नसते. अशा वेळी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण ठरु शकते. यामुळे प्रशासनाने खबरदारी घेत इगतपुरीतील पर्यटनस्थळी १४४ कलम लागू केला आहे.(Section-144-applies-at-Igatpuri-tourist-spot-marathi-news-jpd93)

उत्साही पर्यटकांना रोखण्यास कलम १४४ लागू

कोरोनाच्या निर्बंधांमध्ये काही प्रमाणावर सूट मिळताच उत्साही पर्यटकांच्या होणाऱ्या गर्दीला आवर घालण्यासाठी इगतपुरीतील पर्यटनस्थळी १४४ कलम लागू करण्यात आले आहे. पोलिस निरिक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच पर्यटनस्थळांना (ता.१८) जणू छावणीचे रूप आले होते. पोलिसांवरील ताण यामुळे वाढत असून पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास यापुढेही बंदी असणार आहे. पिंपरीगेट येथे पोलिसांनी नाकाबंदी केली असून पिंपरी गेटपासून एक किलोमीटर परिसरामध्ये वाहनांना बंदीही घालण्यात आली आहे.

इगतपुरीतील पर्यटनस्थळी पोलिसांचा कडक बंदोबस्त

गेल्या काही दिवसांपासून इगतपुरी तालुक्यातील पर्यटनस्थळावर नागरिक गर्दी करायचा प्रयत्न करत होते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने अशा गर्दीमुळे रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता होती. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी वारंवार आवाहन करूनही गर्दी कमी होत नसल्याने पर्यटनस्थळी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. पोलिस निरिक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आर. एल. दिवटे, पोलिस उपनिरीक्षक दीपक पाटील व पोलिस पथकांचा ठिकठिकाणी कडक बंदोबस्त होता.

हेही वाचा: राज्याचे लक्ष लागलेला 'तो' विवाह सोहळा अखेर रद्द!

भावली डॅम, रेल्वे तलाव, नगरपरिषद तलाव, दारणा डॅम, वाकी धरण, कसारा घाट, घाटनदेवी मंदिर परिसर तसेच तालुक्यातील किल्ले परिसरात जमावबंदी लागू केली आहे. पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे आणि पोहण्यासही बंदी घालण्यात आली आहे. धबधब्याखाली उभे राहणे, धोकादायक ठिकाणी सेल्फी घेणे, मद्यधुंद अवस्थेत या ठिकाणी येणे अशा गोष्टींना येथे बंदी केली आहे. - समाधान नागरे, पोलिस निरिक्षक.

हेही वाचा: विकेंडला नाशिककरांची त्र्यंबकेश्वर, अंबोली घाटात मांदियाळी

loading image