नाशिकच्या संकेतची इंडियन टीमच्या शूटिंग ट्रायलसाठी निवड | Indian teams shooting trial Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanket Pagar

नाशिकच्या संकेतची इंडियन टीमच्या शूटिंग ट्रायलसाठी निवड

कळवण (जि. नाशिक) : शरद पवार पब्लिक स्कूलचा माजी विद्यार्थी व नांदुरी येथील सप्तशृंगी वृध्दाश्रम व अनाथाश्रम चे संयोजक गंगा पगार यांचे सुपुत्र कु.संकेत हा दिल्ली येथे झालेल्या कुमार सुरेंद्र सिंघ मेमोरियल शूटिंग चॅम्पियनशिप (Shooting Championship) ह्या अखिल भारतीय स्तरावरील राष्ट्रीय रायफल शुटींग स्पर्धेत ६०० पैकी ६०७ पॉइंट मिळवून त्याची इंडियन टीमच्या ट्रायलसाठी (Indian team trial) निवड झाली आहे. संकेतच्या या यशस्वी कामगिरीने शूटिंग प्रकारात कळवण चे नाव उंचावले आहे. (Selection of sanket from kalavan for Indian teams shooting trial Nashik Sports News)

संकेत हा गेल्या सात वर्षांपासून रायफल शुटींग चा सराव करतोय.उत्तर प्रदेश,गुजरात, मध्यप्रदेश,बिहार अशा वेगवेगळ्या राज्यात जाऊन तो नॅशनल स्पर्धा खेळून आला आहे. गेल्या काही महिन्यापासन तो दिल्ली येथील भारत सरकारच्या डॉक्टर कुर्नीसिंह रायफल शुटींग रेंजमधे सराव करतोय.गेल्या नोव्हेंबर २०२१ मध्ये भोपाळ (मध्यप्रदेश) येथे झालेल्या नॅशनल कॉम्पीटीशन मध्ये क्वालिफाय झाल्यानंतर तो काही काळ मुंबईमधे सराव करत होता.

गेल्या २० जून २०२२ रोजी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तो टीम इंडियाच्या ट्रायलसाठी पात्र ठरलाय.आता पुढील एक महिन्यानंतर इंडियन टीमच्या ट्रायलच्या तारखा निश्चित होतील. संकेतला नशिबाने आणि त्याच्या मेहनतीने जर साथ दिली तर त्याची नक्कीच भारतीय संघात निवड होऊ शकेल असा विश्वास संकेतला आहे.कळवण येथील उद्योजक गंगा पगार यांचा तो मुलगा तर भाजपचे शहराध्यक्ष निंबा पगार यांचा पुतण्या आहे. कळवण सारख्या आदिवासी व ग्रामीण तालुक्यात संकेत पगार सारख्या १९ वर्षीय संकेत पगार ने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे विविध स्तरावरून कौतुक होत आहे.

हेही वाचा: महिनाभरात ७५० टन कैऱ्यांची विक्री

•शरद पवार पब्लिक स्कुल मुळे शुटींग ची आवड -

कळवण सारख्या आदिवासी आणि ग्रामीण भागात शरद पवार पब्लिक स्कूल मानुर या विद्यालयात संकेतने शिक्षण घेत असतानाच शुटींग ची आवड निर्माण झाल्याने स्वतःला झोकून देत प्राचार्य बी.एन.शिदे व क्रिडाशिक्षक सुडके यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने सराव केल्याने त्याची दिल्ली येथील संस्थेत पुढील शिक्षणासाठी निवड झाली.

• शरद पवार पब्लिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण आणि सुविधा देवून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करियर साठी प्रोत्साहित केले जाते.संकेतने शुटींग मध्ये केलेली कामगिरी कौतुकास्पद असून भविष्यात तो ऑलिंपिक सारख्या स्पर्धेत यशस्वी होईल याची खात्री आहे.- डॉ.जे. डी.पवार,संस्थापक, गुरुदत्त शिक्षण संस्था

हेही वाचा: वाहनधारकांनी मोबाईल क्रमांक नोंदवावेत; प्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: Selection Of Sanket From Kalavan For Indian Teams Shooting Trial Nashik Sports News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashikrifle
go to top