१६ चा स्कोअर असूनही होमिओपॅथीने कोरोनाला हरविले!

corona free
corona freeesakal

सिडको (नाशिक) : गेल्या महिन्यात हॉस्पिटल, बेड आणि ऑक्सिजनचा (hospital) तुटवडा निर्माण झाला. (oxygen bed shortage) अशा परिस्थितीत मुंगसरे येथील रहिवासी दशरथ बाबूराव पाटील (वय ६५) यांना त्रास जाणवू लागला. तपासणी केल्यावर ते कोरोना पॉझिटिव्ह आले होते. स्कोअर १६ आला होता...पण काही दिवसांनी चमत्कारच घडला...(senior citizen fight with corona Homeopathy)

तीनच दिवसांत फरक जाणवू लागला...

सकारात्मक (positive thinking) विचार असेल, तर कुठल्याही संकटावर मात करू शकतो. हाच संदेश ६५ वर्षीय वृद्धाने घरीच उपचार घेत १६ चा स्कोअर असताना होमिओपॅथीच्या साथीने कोरोनाला हरवून दिला आहे. गेल्या महिन्यात हॉस्पिटल, बेड आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. अशा परिस्थितीत मुंगसरे येथील रहिवासी दशरथ बाबूराव पाटील (वय ६५) यांना त्रास जाणवू लागला. तपासणी केल्यावर ते कोरोना पॉझिटिव्ह आले होते. स्कोअर १६ आला होता. त्यांना नातलगांनी गोविंदनगर येथील होमिओपॅथीतज्ज्ञ डॉ. प्रदीप भंडारी यांचा नंबर दिला होता. डॉ. भंडारी यांना सर्व रिपोर्ट दाखवून त्यांच्याशी चर्चा केली. रुग्णाचे सकारात्मक विचार पाहाता डॉ. भंडारी यांनी उपचार सुरू केले. तर त्यांना तीनच दिवसांत फरक जाणवू लागला. त्याबरोबर सकस आहार घेतला आणि इच्छाशक्तीच्या बळावर कोरोनाला हरविल्याचे ठणठणीत झालेल्या दशरथ पाटील यांनी सांगितले.

corona free
रेमडेसिव्हिरनंतर आता 'ॲम्फोटेरिसिन' साठी धावपळ

सर्वप्रथम रुग्णाची पूर्ण माहिती जाणून घेतली. त्यांच्या बोलण्यावरून त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन पाहता, त्यांच्यात बरे होण्याची जिद्द होती. त्यानुसार औषधे सुरू केली. १६ स्कोअर असतानाही त्यांनी कोरोनावर मात केली.

-डॉ. प्रदीप भंडारी, गोविंदनगर

corona free
इथे मृत्यूदर वाढतोय; शहरातील नऊ रुग्णालयांना नोटिसा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com