क्रीडा महोत्सवात क्रिकेट खेळताना करताना ज्येष्ठाचा मृत्यू

या घटनेमुळे संयोजकांनी स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
death
deathesakal

इंदिरानगर : इंदिरानगर क्रीडा महोत्सवातील क्रिकेट सामन्यात फलंदाजी करत असताना सुरेश करवा (वय 65, रा. पॅसिफिक अव्हेन्यू अपार्टमेंट) यांचे तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले. त्यामुळे संयोजकांनी स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सायंकाळी झालेल्या शोकसभेत उपस्थित सर्व ज्येष्ठांनी श्री. करवा यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा घेऊन बक्षिसेदेखील त्यांच्या स्मरणार्थ द्यावे असा आग्रह केल्याने रविवारी (ता. १२) महोत्सव पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शनिवारी (ता. ११) सकाळी सात वाजता जल्लोषात या क्रीडा महोत्सवाचे उद्‌घाटन झाले. संयोजक तथा संस्थेचे संस्थापक माजी नगरसेवक ॲड. श्‍याम बडोदे यांनी यानिमित्त सहभागी झालेल्या ३६ संघातील खेळाडूंसाठी मिसळ पार्टीचेदेखील आयोजन केले होते. समारंभात झालेल्या झुम्बा प्रात्यक्षिकात करवा यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांनी तुफान धमाल केली. खेळाडू कमी असल्याने लाइफ मिशन ज्येष्ठ नागरिक संघाकडून ते कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघाविरुद्ध ते पहिला सामना खेळले. सुधाकर चव्हाण यांच्यासोबत त्यांनी चांगली फलंदाजी केली. दुपारच्या सत्रात ते सदस्य असलेल्या जीवन प्रवास ज्येष्ठ नागरिक संघाचा स्टेट बँक निवृत्त कर्मचारी संघाच्या विरोधात सामना होता. प्रथम फलंदाजी करत असताना एक गडी बाद झाल्यानंतर ते फलंदाजीसाठी आले. चौथ्या षटकात त्यांनी उत्कृष्ट चौकारदेखील मारला. पाचव्या षटकात उल्हास कुलकर्णी गोलंदाजी करत होते. तिसरा चेंडू रचनात्मक पद्धतीने त्यांनी खेळून काढला. जवळ असणारे शशिकांत पगारे आणि विजय भावे यांनी चेंडू गोलंदाजकडे परत केला. त्यावेळी आरामात क्रीजमध्ये उभे असलेले करवा अचानक कोसळले. तातडीने त्यांना दवाखान्यात हलवण्यात आले, मात्र तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अचानक झालेल्या या घटनेमुळे सर्व ज्येष्ठ नागरिक आणि उपस्थित प्रेक्षक सुन्न झाले. ॲड. बडोदे यांनी लगेचच महोत्सव स्थगित असल्याचे घोषित केले. दरम्यान, सायंकाळी शोकसभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांसह उपस्थित असलेल्या सर्वच ज्येष्ठांनी संयोजक ॲड. बडोदे यांना स्पर्धा रद्द न करता श्री करवा यांच्या स्मरणार्थ ती पूर्ण करून सर्व बक्षिसेदेखील त्यांच्या स्मरणार्थ देण्यात यावी असा आग्रह धरला.

death
बस मधून सुमारे 3 लाखाचे सोन्याचे दागिने लंपास

श्रद्धांजली वाचताना माजी सभागृह नेता सतीश सोनवणे, पुरुषोत्तम कुलकर्णी, नाना बच्छाव, हेमंत कुलकर्णी, विजय भावे, बाळासाहेब केंगे, अशोक देशपांडे यांनीदेखील याचप्रकारे भावना व्यक्त केल्याने हा क्रीडा महोत्सव पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, ज्या प्रकारची घटना झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. श्री. करवा मूळचे नांदगाव येथील असून कांदा व्यापारी होते. यापूर्वी त्यांची बायपास शस्त्रक्रियादेखील झाल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले. असे असले तरी ते नियमित आणि उत्कृष्टपणे सर्वच बाबतीत अग्रेसर होते अशा आठवणी त्यांच्या मित्रांनी सांगितल्या.

death
नाशिक : ‘त्यांच्या’ कुटुंबीयांसाठी खाकी ठरली देवदूत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com