लग्नाचे आमीष दाखवून विवाहितेवर लैंगिक अत्याचार, जातीवाचक शिवीगाळ; गुन्हा दाखल | Sexual abuse of woman luring marriage caste abuse Filed case at malegaon Nashik Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime Against Women

Nashik Crime: लग्नाचे आमीष दाखवून विवाहितेवर लैंगिक अत्याचार, जातीवाचक शिवीगाळ; गुन्हा दाखल

मालेगाव : शहरातील कलेक्टरपट्टा भागातील निसर्ग हाॅटेल पाठीमागील कॉलनीतील ३५ वर्षीय महिलेला लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर पाच वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला. या महिलेने लग्नाबद्दल विचारणा केली असता तिला जातीवाचक व अश्‍लील शिवीगाळ करण्यात आली.

पिडीतेच्या तक्रारीवरुन लैंगिक अत्याचार करणाऱ्याविरुध्द छावणी पोलिस ठाण्यात बलात्कार व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Sexual abuse of woman luring marriage caste abuse Filed case at malegaon Nashik Crime)

सोयगाव भागातील डीके कॉर्नर येथील नाना महादु चव्हाण (वय ५०, रा. कृष्णनगर) याने पिडीत महिलेशी गेल्या पाच वर्षापासून ते ३ ऑगस्ट २०२३ पर्यंत वेळोवेळी लग्नाचे आमीष दाखवून तिच्या इच्छेविरुध्द तिच्या राहत्या घरी तसेच मनमाड चौफुलीवरील व महामार्गावरील लॉजवर वेळोवेळी बळजबरीने शरीरसंबंध व लैंगिक अत्याचार केले.

पिडीतेने नानाला लग्नाबाबत विचाारणा केली असता त्याने पिडितेला जातीवाचकव अश्‍लील शिवीगाळ केली. तुझा वापर शरीरसुखासाठी केला. त्याबदल्यात तुझा खर्च भागविला. तुझी लायकी आहे का असे म्हणत हिनवले.

पिडीतेने तक्रार दाखल करताच मनमाड येथील उपअधिक्षक सोहेल शेख, पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर, सहाय्यक पोलिस निरीक्षक वर्षा जाधव यांनी भेट देवून चौकशी केली. नाना चव्हाण विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. उपअधिक्षक शेख तपास करीत आहे.