Job Fair : शाहु महाराज पॉलिटेक्‍निकमध्ये उद्या विभागीय रोजगार मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

job fair

Job Fair : शाहु महाराज पॉलिटेक्‍निकमध्ये उद्या विभागीय रोजगार मेळावा

नाशिक : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मविप्र संस्‍थेचे राजर्षी शाहु महाराज पॉलिटेक्निक यांच्यातर्फे मंगळवारी (ता. १४)

सकाळी साडे नऊला गंगापूर रोडवरील राजर्षी शाहु महाराज पॉलिटेक्निक येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा (Job Fair) पार पडेल.(Shahu Maharaj Polytechnic will have a departmental job fair on 14 feb nashik news)

मेळाव्यात २३ नामांकित कंपन्या व नियोक्ते तीन हजाराहून अधिक पदांकरिता मुलाखती घेतील. पाचवी, दहावी, बारावी, तसेच कोणत्याही शाखेतील पदवी, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, अभियांत्रिकी पदवी, एमबीए आदी विविध शैक्षणिक पात्रताधारकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.

स्वयंरोजगारासाठी आर्थिक साहाय्य करणारी शासनाची विविध महामंडळे यांचे स्टॉल लावण्यात येणार असून कर्ज योजनांची माहिती व मार्गदर्शन केले जाणार आहे. नोकरी इच्छुक उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

तसेच लॉगिन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अर्ज करावे. सहाय्यतेसाठी कार्यालयाच्या ०२५३-२९९३३२१ या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा.

सहभागी होण्याचे आवाहन सहायक आयुक्त अनिसा तडवी, मविप्र संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, प्राचार्य प्रशांत पाटील आदींनी केले आहे.