शेतकऱ्यांनो लवकर चित्र पालटेल, त्यासाठी प्रयत्न करू - शरद पवार

sharad pawar
sharad pawaresakal

खेडगाव (जि.नाशिक) :- देशातील बहुसंख्य घटक कष्टकरी, शेतकरी यांच्या जीवनात बदल करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (sharad pawar) यांनी केले. दरम्यान महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे भवितव्य अंधकारमय असताना कादवा कारखान्याच्या माध्यमातून बंद पडलेल्या साखर कारखान्यांना ऊर्जितावस्था आणण्याला बळ दिल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी केले.

खेडगाव येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयच्या नूतन इमारतीचा उदघाटन व ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांच्या अमृतमहोत्सवी सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार व राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडला. त्यावेळी बोलत होते.

शेतकऱ्यांनो लवकर चित्र पालटेल..

कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. पवार म्हणाले, महाराष्ट्रात शैक्षणिक संस्थांचे जाळे उभारण्यासाठी ज्यांनी योगदान दिले त्यात नाशिक जिल्ह्यातील कर्मविरांचा मोठा वाटा आहे. फुले, शाहू, आंबेडकरांचे आपण नाव घेतो ते केवळ त्यांनी देशाला दिलेल्या महत्वपूर्ण योगदानामुळेच. महात्मा फुले आधुनिकतेचे पुरस्कर्ते होते आणि नाशिकमध्ये झालेले साहित्य संमेलन देखील विज्ञानाला वाहून दिले, हा फुले यांच्या कार्याचा गौरव आहे. दुध उत्पादनासाठी संकरीत गाईंची गरज किती आहे, हे महात्मा फुले यांनी देशाला पटवून दिले. त्यामुळेच आजही ज्ञानाचा दीप तेवत आहे, असे नमूद केले. शेतकर्यांच्या जीवनात आवश्यक बदल घडविण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील. द्राक्ष, उस, डाळिंब, फुल, कांदा आदी पिकांसाठी चांगले दिवस आणण्यासाठी प्रयत्न करू. लवकर चित्र पालटेल, असा विश्वास व्यक्त केला.

नरहरी झिरवाळ यांनी, शरद पवार उतारवयातही जे काम करीत आहे, ते कोणीही करू शकत नाही. श्रीराम शेटे साहेब यांनी तीनदा पराभव स्विकारला. मात्र, त्यांचा आदर्श घेऊनच मला पुढे राजकारणात यश मिळाल्याचा उल्लेख केला. एकदरा सिंचनप्रश्नी अधिकार्यांसोबत बैठक घेण्याची गळ यावेळी त्यांनी पवार यांना घातली. वनजमिनींच्या पट्ट्यांसाठी लक्ष देऊन आदिवासी बांधवांना न्याय देण्याची विनंती केली. नवोदय विद्यालय जिल्ह्यात मंजूर करून विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लावावा. द्राक्ष उत्पादकांसाठी चांगल्या पॅकेजची घोषणा करण्याबरोबरच कर्जमाफीबाबत उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली.

श्रीराम शेटे म्हणाले, शिक्षण झाल्यानंतर मी शेती व्यवसायाला लागलो. चिखल, माती तुडवत असताना शेतीतील अडचणी व शेतकर्यांच्या समस्या लक्षात आल्या. त्यानंतर माझे राजकारणात येणे झाले. ग्रामपंचायत, पंचायत समिती असा प्रवास करून आदिवासी, शेतकरी, गरजूंना मदत करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून रस्ते बांधण्यासाठी दिल्लीला पाठविलेला प्रस्ताव तत्काळ मंजूर झाला. साहजिकच तालुक्यातील गावे एकमेकांना जोडली गेली. नंतरच्या काळात धरणांतील पाणी पोटचार्यांच्या माध्यमातून शेतात आणल्याने विविध पिके शेतकर्यांना घेता आली. शरद पवार यांच्यासमोर मांजरपाडा प्रकल्पाचा प्रश्न मांडताच तत्कालीन पाटबंधारे मंत्री अजित पवार यांनी मंजुरी दिल्याचे सांगत पवार साहेबांचे नाशिक जिल्ह्यावरील प्रेम किती आहे, हे सांगितले. कादवा कारखाना निवडणुकीत तीनदा पराभव झाल्यानंतर मात्र मला तालुकावासियांना प्रचंड मतांनी निवडून दिले. कारखाना कर्जातून बाहेर काढण्यासाठी शरद पवार यांच्या नावाने पतसंस्थेची स्थापना केली अन् कारखाना सुस्थितीत सुरू झाल्याचे सांगत शरद पवार यांनी केलेल्या सहकार्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

या वेळी व्यासपीठावर पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार श्रीनिवास पाटील, प्रभारी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, अध्यक्ष डाॅ. तुषार शेवाळे, आमदार दिलीप बनकर, कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, मविप्रचे सभापती माणिकराव बोरस्ते, आदी उपस्थित होते. पालकमंत्री भुजबळ यांनी, श्रीराम शेटे यांच्या कार्याविषयी स्तुतीसुमने उधळताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यातील योगदानाचे आवर्जून कौतूक केले. ज्या कारखान्यावर हजारो शेतकरी, कामगारांचे भवितव्य अवलंबून आहे, ती आस्थापना सुस्थितीत ठेवण्यासाठी मदत केली. बंद पडलेले साखर कारखाने सुरू करण्यासाठी श्रीराम शेटे यांना सल्लागार म्हणून नियुक्त करण्याचे सांगून त्यांच्या कार्याचा गौरव केला. शेटे शेवटपर्यंत पवारांसोबत राहिले ही अभिमानाची बाब आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com