Shiv Jayanti 2023 : शिवजन्मोत्सवाचा उत्साह शिगेला; गडकिल्ल्यांसह शिवरायांची भव्य मूर्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

61 feet tall statue being erected at Ashokastambh.

Shiv Jayanti 2023 : शिवजन्मोत्सवाचा उत्साह शिगेला; गडकिल्ल्यांसह शिवरायांची भव्य मूर्ती

नाशिक : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमिवर शहरात ठिकठिकाणी गडकिल्ले साकारण्यात आले आहेत. तर, अशोकस्तंभावर तब्बल ६१ फूट उंचीची शिवरायांचा ऐतिहासिक मुर्ती उभारण्याचे कार्य अंतिम टप्प्यात आहे.

शहराच्या चौफेर जयंतीची जय्यत तयारी सुरू असल्याने शिवरायांच्या जयंतीचा उत्साह शिगेला पोचल्याचे दिसून येते. (Shiv Jayanti 2023 excitement of Shiv Janmoatsava reached peak magnificent idol of chhatrapati along with forts decoration nahsik news)

A replica of the grand fort with Panchavati fountain erected.

A replica of the grand fort with Panchavati fountain erected.

रविवारी (ता. १९) छत्रपती शिवरायांची जयंती आहे. कोरोनानंतर यंदाची जयंती अधिक उत्साहाने साजरी करण्यासाठी शहरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक मंडळासह राजकीय नेत्यांनीही जयंतीची तयारी केली आहे.

गडकिल्ल्यांसह शिवरायांची भव्य मूर्ती साकारली आहे. तर, विविध ठिकाणी शिवचित्रकारांचे व्याख्यान आयोजित केले आहे. भगव्या पताका, स्टेज, मंडप उभारून शिवरायांच्या जीवनावर आधारित देखावे साकारले जात आहेत. रविवारी शहरात ठिकठिकाणी मिरवणूकदेखील निघणार आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

A replica of the grand fort erected on Shivaji Road.

A replica of the grand fort erected on Shivaji Road.

नितीन बानगुडे पाटलांचे आज व्याख्यान

राजेबहाद्दर लेन मित्रमंडळातर्फे शिवचरित्रकार प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे शुक्रवारी (ता. १७) सायंकाळी ७ वाजता भद्रकालीतील संत गाडगे महाराज चौकात व्याख्यान आयोजित केले आहे. या कार्यक्रमासाठी मित्रमंडळाचे अध्यक्ष नीलेश कुसमोडे, नितीन रोठे पाटील, जितेंद्र ठाकूर यांनी पुढाकार घेतला आहे.

६१ फूट उंचीची भव्य मूर्ती

अशोकस्तंभ साईबाबा मित्रमंडळातर्फे यंदा छत्रपती शिवरायांची ६१ फूट उंच मूर्ती साकारली आहे. त्याची वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली जाणार आहे.

भाजप माथाडी सेलचे शहराध्यक्ष व्यंकटेश मोरे यांच्या संकल्पनेतून साकारली जात असलेल्या या मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात पोचले आहे. ‘शिवरायांचे आठवावे रुप’ याची साक्ष देणारा हा देखावा आकारास येत आहे.