
Shiv Jayanti 2023 : तिथीनुसार शिवजयंती उत्साहात; मिरवणुकीत 2 चित्ररथांचा समावेश
जुने नाशिक : तिथीनुसार शिवजयंतीनिमित्त जुने नाशिक भागातील दोन मंडळांकडून मिरवणूक काढण्यात आली. मर्दानी खेळ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची १५ फुटी अश्वारूढ मूर्ती निवडणुकीचे आकर्षण ठरले.
शहीद भगतसिंग क्रांतिदल मंडळ द्वारका आणि भोईराज फाउंडेशन मित्र मंडळ भोईगल्ली यांच्याकडून शुक्रवार (ता.१०) छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. (Shiv Jayanti in excitement by tithi 2 Chitrarathas included in procession nashik news)
त्यांच्याकडून सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पारंपारिक मिरवणूक मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. शांतीगिरी महाराज तसेच उपस्थित अन्य मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकीची सुरवात करण्यात आली.
या वेळी महंत बालकदास महाराज, महंत परमचरणदास महाराज, महंत रामायणदास महाराज, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पवार, बाळा पाठक, रामसिंग बावरी, मामा राजवाडे, करण बावरी, बबलू परदेशी, जगन पाटील, श्याम पवार आदी उपस्थित होते.
हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण
दोन्ही मंडळांच्या दोन चित्ररथांचा मिरवणुकीत सहभाग होता. दोन्ही मंडळाकडून सादर केलेले मर्दानी खेळ मिरवणुकीचे आकर्षण ठरत होते. शहीद भगतसिंग क्रांतिदल मंडळातर्फे १५ फुटी छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती तर भोईराज फाउंडेशन मित्र मंडळातर्फे रायगड किल्ल्याची प्रतिकृती असलेले देखावे उभारण्यात आले होते.
मिरवणुकीतही या देखाव्याचा समावेश करण्यात आला होता. पारंपारिक वाद्याच्या आवाजात मिरवणूक काढण्यात आली. अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांनी अधिकाऱ्यांसह मिरवणुकीची पाहणी करत सुरक्षेचा आढावा घेतला.