भाजपच्या अपयशी कामकाजाचा शिवसेना करणार पदार्फाश! टप्प्याटप्प्याने इनकमिंग सुरू

shivsena bjp.jpg
shivsena bjp.jpg

नाशिक : नाशिक शहरात शिवसेनेचे कार्यकर्ते आता मच्छर हटावसाठी फॉगिंग करणार आहेत. दिवगंत मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बुधवार (ता.६)पासून शिवसेनेने हा उपक्रम सुरू केला आहे. महापालिकेत भाजपची सत्ता असून, तब्बल अडीच वर्षांपासून फॉगिंगची निविदाच निघालेली नसल्याने सामाजिक उपक्रमातून भाजपच्या अपयशी कामकाजाचा शिवसेना पदार्फाश करणार आहे. 

भाजपच्या अपयशी कामकाजाचा शिवसेना करणार पदार्फाश 

मुदत संपल्यानंतर काम न करता देयके दिली जात आहेत. शहरात डासांच्या उच्छादाने नागरिक हैराण असताना सत्ताधारी कारभाऱ्यांना त्याचे सोयरेसुतक नाही. शहर दत्तक घेतल्याचा दावा करणाऱ्या भाजपच्या काळात शहराची वाट लागली आहे. त्यामुळे शिवसेनेने ८० टक्के समाजकारण या ध्येयानुसार फॉगिंगचा उपक्रम हाती घेतला आहे. शिवसेना कार्यालयात फोन करा, शिवसैनिक फॉगिंग करतील. शाखाप्रमुख स्वतः फॉगिंग मशीन ऑपरेट करून सत्ताधाऱ्यांचे अपयश लोकांसमोर आणतील. शालीमार येथील शिवसेना भवनात ममता दिनानिमित्त अभिवादन केल्यानंतर शिवसेनेतर्फे वॉर्डप्रमुखांना प्रातिनिधिक स्वरूपात फॉगिंग यंत्राचे वितरण झाले.


टप्प्याटप्प्याने इनकमिंग 
करंजकर म्हणाले, की शिवसेनेचे नेते संजय राऊत गुरुवारी (ता.७) नाशिकला येणार असून, त्यांच्या उपस्थितीत भाजपचे दोन प्रमुख नेते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. भाजपमधील अनेक जण शिवसेनेत परतण्यास इच्छुक असून, टप्प्याटप्प्याने हे इनकमिंग सुरू राहील. महानगरला सुरू असलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यांना, शाखा उद्‌घाटनांना मोठा प्रतिसाद मिळत असून, आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना सत्तेत येईल, असा दावा त्यांनी केला. 

हेही वाचा > निर्दयी मातेनेच रचला पोटच्या गोळ्याला संपविण्याचा कट; अंगावर काटा आणणारा संतापजनक प्रकार उघड 

शिवसेनेचे उपनेते माजी मंत्री बबनराव घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, खासदार हेमंत गोडसे, दत्ता गायकवाड, माजी महापौर विनायक पांडे, महिला आघाडी संपर्कप्रमुख सत्यभामा गाडेकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. महानगरप्रमुख बडगुजर म्हणाले, की महापालिकेत अडीच वर्षांपासून पेस्ट कंट्रोलची निविदा प्रलंबित आहे. यावेळी विभागप्रमुख देवा बिरारी, नितीन चिडे, सचिन पिंगळे, दीपक दातीर, वैभव ठाकरे, मंगला भास्कर, मंदा दातीर, प्रेमलता जुन्नरे, शोभा गटकळ, शोभा मगर, दत्ता दंडगव्हाळ आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com